मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर केल्या जात आहे. यातच राज्यात विधानसभेच्या म
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर केल्या जात आहे. यातच राज्यात विधानसभेच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदानाची सुट्टी असणार आहे.
विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे 20 नोव्हेंबर 2024 या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान, महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने 20 नोव्हेंबर म्हणजे मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. राज्यातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी शासनाने सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. शासन परिपत्रकानुसार, राज्यातील विविध मतदारसंघातील व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम आणि इतर कोणत्याही आस्थापनेत कार्यरत असणार्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार आहे. यानुसार, उद्योग विभागात येणार्या उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या आणि संस्था किंवा इतर आस्थापनांना हे शासन परिपत्रक लागू राहील. या दिवशी सुट्टी मंजूर झाल्याने या व्यक्तीच्या पगारात कोणतीही कपात केली जाणार नाही. तसेच पूर्णदिवस सुट्टी देता येणे शक्य नसल्यास अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्याचे सरकारने आस्थापनांना आवाहन केले आहे.
COMMENTS