Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाबा सिद्दिकींच्या हत्येत अनमोल बिश्‍नोईचा हात

मुंबई :माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी

स्वपक्षातील नेत्यांचेच माझ्याविरोधात षडयंत्र
डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि केले हे कृत्य | LOK News 24
जर सर्व पक्ष एकत्रित लढले तर २०२४ ला भाजपचा पराभव होईल – अमोल मातेले 

मुंबई :माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली असली तरी त्यांच्या हत्येची सुपारी कुणी दिली आणि कोणत्या कारणावरून दिली याचा खुलासा होत नव्हता. अखेर यासंदर्भात बुधवारी मुंबई गुन्हे शाखेने आता मोठा खुलासा केला आहे. गोळीबार करणारे हे लॉरेन्स बिश्‍नोईचा भाऊ अनमोल बिश्‍नोई याच्या थेट संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळेच बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे बिश्‍नोई गँगचाच हात असल्याची खात्री आता अधिकार्‍यांना झाली आहे. मात्र, हत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
अभिनेता सलमान खानशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे सिद्दिकी यांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. अनमोल बिश्‍नोई हा शूटर आणि कट रचणारा प्रवीण लोणकर यांच्या संपर्कात असल्याचे डिजिटल पुराव्यांवरून समोर आले आहे. अनमोल कॅनडा आणि अमेरिकेतून आरोपींच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींशी संवाद साधण्यासाठी अनेक स्नॅपचॅट अकाऊंटचा वापर करण्यात आल्याची माहिती तपास करणार्‍या पथकाला मिळाली आहे. स्नॅपचॅटच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात होते आणि मेसेजद्वारे संवाद साधल्यानंतर ते लगेचच मेसेज डिलीट करायचे. यातील काही अकाऊंट ही अनमोल बिश्‍नोईशी जोडलेली आहेत.

COMMENTS