Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आपचा विधानसभेच्या मैदानातून काढता पाय

मुंबई : विधानसभा निवडणुकीच यंदा सर्वाधिक राजकीय पक्षांचे पीक आले असतांनाच आम आदमी पक्ष अर्थात आपने मात्र या निवडणुकीतून काढता पाय घेतला आहे. दिल्

कोविडच्या नव्या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात : ना. शंभूराज देसाई
वेश्यांसाठी आलेल्या अनुदानात अपहार ; नगरच्या प्रसिद्ध संस्थेविरोधात तक्रार
गेट वे ऑफ इंडिया येथे उद्या ‘लाईट आणि साऊंड शो’

मुंबई : विधानसभा निवडणुकीच यंदा सर्वाधिक राजकीय पक्षांचे पीक आले असतांनाच आम आदमी पक्ष अर्थात आपने मात्र या निवडणुकीतून काढता पाय घेतला आहे. दिल्ली विधानसभा निवडणूकीवर लक्ष केंद्रीत करत महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय आपने घेतला आहे. मात्र यासोबतच महाविकास आघाडीला बळ देण्याचा निर्णय आपने घेतला आहे.
हरियाणात आपने निवडणूक स्वबळावर लढली होती. त्याचा थेट फटका काँग्रेसला बसून भाजपचा मोठा फायदा झाला होता. याचे विरोधकांच्या इंडिया आघाडीत तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे आपने महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीत सावध भूमिका घेत या दोन्ही राज्यांतील निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी इंडिया आघाडीला पाठिंबा देईल. आपच्या या भूमिकेमुळे विरोधकांच्या मतांची विभागणी टळून त्याचा थेट फटका भाजप पर्यायाने महायुतीला बसण्याची शक्यता आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, आपकडून सध्या केवळ दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. यासाठी हा पक्ष इंडिया आघाडी मजबूत करण्यासह पक्षसंघटना बळकट करण्यावर भर देत आहे. दुसरीकडे, आपची महाराष्ट्रातील कार्यकारिणी विधानसभा लढवण्याची तयारी करत होती. पण आपने येथील एक-दोन जागांसाठी वाटाघाटी करण्यात वेळ वाया न घालता इंडिया आघाडीला बळ देण्याचा निर्णय घेतला.

COMMENTS