Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धुळे जिल्हा निरीक्षकपदी बाळासाहेब नाहटा यांची नियुक्ती

श्रीगोंदा : श्रीगोंदा बाजार सामतीचे माजी सभापती आणि अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजा

राहुरीचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांचे निलंबन
टाकळी ग्रामस्थांनी घेतला केवळ वृक्ष लागवड नव्हे; संवर्धनचाही वसा
गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याला सुटणार उन्हाळी आवर्तन

श्रीगोंदा : श्रीगोंदा बाजार सामतीचे माजी सभापती आणि अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांच्यावर पक्षाने आणखी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य पणन मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत बाळासाहेब नाहटा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त संचालक निवडून आणण्याचा करिष्मा दाखवला. त्यांच्या या यशस्वी नेतृत्वामुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष श्री. सुनील तटकरे यांनी त्यांची धुळे जिल्ह्याच्या निरीक्षकपदी जाहीर नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक कार्यकर्त्यांनी बाळासाहेब नाहाटा यांचे हार्दिक अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संघटनात्मक विस्तार होऊन व बळकटी येईल असा विश्‍वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

COMMENTS