Homeताज्या बातम्यादेश

शुभंकर सरकार बंगाल काँग्रेसचे नवे अध्यक्ष

नवी दिल्ली ः पश्‍चिम बंगालमध्ये काँग्रेसने मोठे फेरबदल केले असून सुभंकर सरकार यांना प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले आहे. सध्या ते अ

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला खिंडार
सांगलीच्या कर्नाळ रोड दत्त नगरमध्ये चोरी
उद्यापासून रेमडेसिवीरचा पुरवठा होणार | पहा ‘सुपरफास्ट महाराष्ट्र’ | Lok News24

नवी दिल्ली ः पश्‍चिम बंगालमध्ये काँग्रेसने मोठे फेरबदल केले असून सुभंकर सरकार यांना प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले आहे. सध्या ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव होते. त्यांच्याकडे अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि मिझोराम या राज्यांची जबाबदारी होती. आता त्यांना अधीर रंजन चौधरी यांच्या जागी बंगालचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आहे. काँग्रेसने पश्‍चिम बंगालशिवाय जम्मू-काश्मीरमध्येही दोन कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. यामध्ये एमके भारद्वाज आणि भानू महाजन यांच्या नावाचा समावेश आहे.

COMMENTS