Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुनीता इंगळे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

कोपरगाव तालुका ः विश्‍वकर्मा वंशीय समाजाचा महामेळावा  विश्‍वकर्मा मंदिर वेरूळ येथे आयोजित करण्यात आला होता यात कोपरगाव येथिल नगरपालिका शाळा क्रमा

बनावट सोने प्रकरणातील 160 जणांना पकडण्याचे शेवगाव पोलिसांसमोर आव्हान
भारताची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत दुसर्‍या क्रमांकाची होईल : कडलग
स्मशानभूमीतील ती लोखंडी जाळीही चोरट्यांनी चोरली

कोपरगाव तालुका ः विश्‍वकर्मा वंशीय समाजाचा महामेळावा  विश्‍वकर्मा मंदिर वेरूळ येथे आयोजित करण्यात आला होता यात कोपरगाव येथिल नगरपालिका शाळा क्रमांक सहा च्या उपशिक्षिका सुनिता इंगळे यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची नोंद घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी भगवान विश्‍वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून व उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी संस्थापक नागोराव पांचाळ, आमदार रमेश बोरणारे, आमदार प्रशांत बंब, विभागीय अध्यक्ष राजकुमार राऊत, राज्य प्रवक्ते भाऊसाहेब राऊत, विभागीय उपाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, जिल्हा अध्यक्ष प्रसाद गडकर, जिल्हा कार्याध्यक्ष आदिनाथ भालेकर, जिल्हा सचिव अशोक गोरे, राज्य महिला प्रमुख सुनिता भालेराव यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्यांना नुकतेच राज्य शासनाचा थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने मुंबईत गौरवण्यात आले होते. 

COMMENTS