Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकही पात्र लाडकी बहिण योजनेपासून वंचित राहणार नाही

आमदार प्रा. राम शिंदे यांचा विश्‍वास

कर्जत : कर्जत-जामखेड तालुक्यात आतापर्यंत एक लाख दोन हजार लाडक्या बहिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरित पात्र ला

निकालाने ते खालच्या पायरीवर आले ः आ.प्रा. राम शिंदे
सीनाचे आवर्तन सोडण्याचे आ. राम शिंदे यांचे आदेश
कर्जत व जामखेडमधील 6 रस्त्यांसाठी 60 लाखांचा निधी मंजूर  

कर्जत : कर्जत-जामखेड तालुक्यात आतापर्यंत एक लाख दोन हजार लाडक्या बहिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरित पात्र लाभार्थींना या योजनेचा लवकरच लाभ मिळेल, एकही पात्र लाडकी बहिण या योजनेपासून वंचित राहणार नाही. या योजनेला विरोधकांनी विरोध केला, योजना बंद करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. पण महायुती सरकारने ही योजना सुरू राहील हे ठामपणे सांगितले, मग तुम्हीच ठरवा तुमचा सख्ख्या व सावत्र भाऊ कोण आहे ? असा सवाल आ. प्रा. राम शिंदे यांनी उपस्थित केला. ’लाडकी बहीण’ योजनेतून लाभ मिळालेल्या कर्जत शहर व परिसरातील भगिनींच्या वतीने कर्जत येथील मंगल कार्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार प्रा. राम शिंदे पुढे म्हणाले, कर्जत शहराचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी आपण तीस कोटींची पाणी योजना दिली. मात्र आता आठ- आठ दिवस पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे. आपण महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवला मात्र आता लोकांना पाणी मिळत नाही. कुकडीचे पाणी, तुकाई चारी, अमरापूर-भिगवण रस्ता, एमआयडीसी, सीना धरणात ओव्हर फ्लोचे पाणी सोडून धरण भरुन घेतले. मतदारसंघात अनेक देवस्थानामध्ये तीर्थक्षेत्र विकासमधून कामे केली. कर्जत बाजारतळावर चिखलाचे साम्राज्य होते ते दूर केले, जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविली, त्यातून अनेक गावे टॅकर मुक्त झाली. पोलीस स्टेशन, पंचायत समिती, न्यायालय, उपजिल्हा रुग्णालय, कर्जतची स्मशानभुमी, सिद्धटेक येथे 400 केव्ही वीज केंद्र अशी अनेक कामे केली. राज्य सरकारने विविध योजना सुरू केलेल्या आहेत. मी गरीब आहे पण दिलदार आहे, मी नेहमीच सन्मान करतो, अवमान करत नाही. कर्जत जामखेडची जनता स्वाभिमानी आहे, याचे उत्तर लवकरच मिळेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. सुपा येथील सुतगिरणी का बंद पडली हे मी निवडणूकीत सांगेल. लवकरच दुसरी सुत गिरणी मंजूर होईल. कर्जत-जामखेड तालुक्यातील जनतेमुळे मला मान सन्मान आहे. विकासकामात आपण कोठेही कमी पडणार नाही, ही लाडक्या भावाची गॅरंटी आहे, असेही आ. शिंदे म्हणाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या मोहीनी घुले, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका आशा तापकीर, माजी सरपंच सुनंदा पिसाळ, सिंधुताई जमदाडे, नगरपंचायतीच्या विरोधी पक्षनेत्या अश्‍विनी गायकवाड, माजी नगरसेविका राणी गदादे, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रतिभा रेणूकर, सुवर्णा पोटरे, शहराध्यक्षा आरती थोरात, अश्‍विनी क्षीरसागर, तालुकाध्यक्षा मनिषा वडे, आशा वाघ, साधना कदम, माजी नगरसेविका निता कचरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, उपसभापती आबासाहेब पाटील,  तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष शरद म्हेत्रे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील यादव, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे, शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, माजी सरपंच काकासाहेब धांडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके, धनंजय मोरे,  डॉ. विलास राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS