Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोधेगावात किसनगिरी बाबांच्या जन्मसोहळयास भाविकांची मांदियाळी

नेवासाफाटा : महान तपस्वी दत्त अवतारी श्री समर्थ सदगुरू किसनबाबा यांची जन्मभूमी असलेल्या नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे श्री समर्थ सदगुरू किसनगिर

संत कवी महिपती महाराजांच्या फिरता नारळी हरिनाम सप्ताहास सुरूवात
LokNews24 l लोक न्यूज २४ व लोकमंथनच्या तत्परतेने गुजरातमध्ये रोखला बालविवाह
स्पीड ब्रेकर व माहिती फलक लावण्यासाठी रस्ता रोको आंदोलन

नेवासाफाटा : महान तपस्वी दत्त अवतारी श्री समर्थ सदगुरू किसनबाबा यांची जन्मभूमी असलेल्या नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांचा जन्म दिन सोहळा देवगड गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.संतांबद्दल असलेल्या श्रद्धेला व भक्तीभावाला शेवटच्या श्‍वासापर्यंत जपा असे आवाहन गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले.
श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या सेवाधारी भक्त मंडळ व गोधेगाव ग्रामस्थ यांच्या उत्कृष्ट नियोजनात या जन्मदिन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.जन्मदिनाच्या निमित्ताने श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबा व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या जन्मस्थानावरील पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य कांतागुरू जोशी यांनी केले. श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे कीर्तन झाले. सदगुरू किसनगिरी बाबांनी प्रवरामाईच्या तीरावर कठोर तपश्‍चर्या करून भक्तांच्या कल्याणासाठी गुरुदेव दत्त पिठाची निर्मिती केली, श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांचा महिमा अगाध असा असून त्यांचे कार्य भक्तांच्या कल्याणासाठी होते त्यांच्या या कार्याला पुढे नेण्याचे कार्य गुरुवर्य देवगडचे बाबाजी हे करत असून त्यामुळे लाखो भक्त परिवार तीर्थक्षेत्र देवगडला जोडला गेले आहे, सदगुरू किसनगिरी बाबा हे देह रूपाने नसले तरी त्यांचे वास्तव्य हे देवगड येथे होत असल्याने त्याचा अनुभव पारमार्थिक कार्याच्या माध्यमातून येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलतांना गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज म्हणाले की सदगुरू किसनगिरी बाबांच्या कार्याची महती व या परिसराचे नाव देशभर गेले असून संत परंपरेत अवतीर्ण होऊन त्यांनी भक्तांना सुख व समाधान प्राप्त करून दिले आहे, आतापर्यंत संत विचाराने सर्व कार्य आम्ही करत आलो आहे, आता हे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी भावी पिढीचा आधारस्तंभ असलेल्या पुढील पिढीला करायचे आहे,संतांबद्दल असलेला भक्तिभाव वृद्धिंगत होण्यासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत त्यांच्याबद्दल असलेल्या श्रद्धेला जपा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले. या प्रसंगी श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा सेवाधारी मंडळाच्या वतीने गुरुवर्य शांतीब्रम्ह श्री भास्करगिरीजी बाबाजी व स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी यांचे संतपूजन करण्यात आले. यावेळी महाआरती होऊन उपस्थित भाविकांना आमटी भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या जन्मदिन सोहळयाच्या प्रसंगी युवा नेते उदयनदादा गडाख, गायनाचार्य रामनाथ महाराज पवार, पंढरीनाथ महाराज मिस्तरी, लक्ष्मण महाराज नांगरे, बाळू महाराज कानडे, मृदुंगाचार्य दादा महाराज साबळे, विजय महाराज पवार, शुभम महाराज बनकर, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, ज्ञानेश्‍वर महाराज हजारे, अमोल महाराज बोडखे, मृदुंगाचार्य दादा महाराज साबळे,शशिकांत महाराज कोरेकर, रामनाथ महाराज शेळके, बालू महाराज पडूंरे यांच्यासह पंचक्रोशीतील पुरुष व महिला युवक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित भाविकांना आमटी भाकरी प्रसादाचे वाटप करण्यात आले.

COMMENTS