पुणे : राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवारी रात्री हत्या करण्यात आल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली होती. मात्र वनराज आ
पुणे : राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवारी रात्री हत्या करण्यात आल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली होती. मात्र वनराज आंदेकर यांची कौटुंबिक आणि मालमत्तेच्या वादातून एका टोळक्याने निर्घृण हत्या केली. या घटनेवेळी वनराज याची सख्खी बहीण तिच्या घराच्या गॅलरीमधून ’याला मारा, मारा’ म्हणत होती अशी तक्रार वनराज यांच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केली आहे. त्यानुसार, आंदेकर यांच्या दोन सख्ख्या बहिणींसह त्यांचे पती अशा 4 जणांना अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात सहभागी असलेल्या सराईत गुंड सोमनाथ गायकवाड यासही टेंभुर्णी येथून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. कौटुंबिक वादातून हा खून करण्यात आला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. वर्चस्वाच्या वादातून जावयानेच या खूनाचा कट रचल्याचे सांगण्यात येत आहे. वनराज आंदेकर यांची काल नाना पेठ परिसरात गोळीबार करून त्यांचा खून करण्यात आला. वनराज यांच्या वडिलांनी समर्थ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, त्यांच्याच दोन मुलींनी आणि दोन मेव्हण्याच्या सांगण्यावरून हे कृत्य केले आहे. आत्तापर्यंत 10 आरोपी निष्पन्न झाले असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आत्तापर्यंत 10 आरोपी निष्पन्न झाले असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गणेश कोमकर हा आंदेकर यांचा जावई आहे. त्याला नाना पेठेतील एक दुकान दिले होते. महापालिकेने अतिक्रमण कारवाईमध्ये हे दुकान पाडले. त्यानंतर कुटुंबामध्ये वादाला सुरुवात झाली. आंदेकर कुटुंबाच्या आशिर्वादानेच गणेश कोमकर हा गुंडगिरी करीत होता. गणेश कोमकर याने स्वत:ची गँग तयार केली होती. एका भांडणामध्ये मध्यस्थी करून भांडणे मिटवल्याच्या तसेच दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावल्याचा रागातून बहिणीने वनराज यांना ’तुला पोरं बोलवून ठोकतेच’ अशी धमकी दिली होती. त्यानंतर वनराज यांच्यावर हल्ला झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुण्याच्या गुन्हेगारी विश्वासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आंदेकर याच्यावर झाडल्या 5 गोळ्या – गणेश कोमकर याने या अगोदर शिवसेना शहर प्रमुच रामभाऊ पारेख यांच्यावर अॅसिड हल्ला केला होता. वनराज आंदेकर याला आपल्यावर हल्ला होऊ शकतो, याची जाणीव होती. त्यामुळे तो सतत आपल्या टोळीतील मुलांच्या घोळक्यात वावरत असे. रविवारी घरगुती कार्यक्रम असल्याने त्याच्याबरोबर मुले नव्हती. घरातील कार्यक्रम संपल्यानंतर तो रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास डोके तालीम जवळील अशोक चौकातील कार्यालयाजवळ येऊन थांबला होता. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या 10 ते 12 हल्लेखोरांनी एका पाठोपाठ 5 गोळ्या झाडल्या.
COMMENTS