Homeताज्या बातम्यादेश

पूजा खेडकरला 5 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा

नवी दिल्ली ः वादग्रस्त आणि माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाने 5 सप्टेंबरपर्यंत लांब

पूजा खेडकरला अटकेपासून दिलासा
‘आयएएस’ पूजा खेडकरची निवड रद्द !  
पूजा खेडकरच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी  

नवी दिल्ली ः वादग्रस्त आणि माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाने 5 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकली आहे. दिल्ली पोलिसांनी पूजाच्या उत्तरावर विचार करण्यासाठी आणि नवीन स्टेटस रिपोर्ट दाखल करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. तसेच 5 सप्टेंबर पूजा खेडकरला अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
यूपीएससीने पूजा खेडकरची आयएएसपदी झालेली निवड रद्द करत, तिला भविष्यात यूपीएससीची परीक्षा देण्यास प्रतिबंध केला होता. तसेच आयोगाची फसवणूक करत, नावामध्ये बदल करून अनेकवेळेस परीक्षा दिल्याचा तिच्यावर आरोप आहे. या आरोपांबाबत दिल्ली उच्च न्यायालयात दिलेल्या उत्तरात पूजा खेडकर म्हणाल्या की, एकदा प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड आणि नियुक्ती झाल्यानंतर युपीएससीला आपली उमेदवारी अपात्र ठरवण्याचा अधिकार नसल्याचे म्हणत आपल्या नावात कोणतीही फेरफार केली नसल्याची बाब तिने न्यायालयापुढे मांडली. यूपीएससी आणि दिल्ली पोलिसांच्या तक्रारीवर उत्तर देण्यासाठी न्यायालयाने पूजा खेडकरला वेळ दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये युपीएससीने पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करत याचिका दाखल केली होती. यामध्ये तिने आयोगासह जनतेची फसवणूक केल्याची बाब अधोरेखित करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनीही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली होती. कारण पूजा खेडकरला दिलेला कोणताही दिलासा तपासात अडथळा आणेल आणि या प्रकरणाचा जनतेवर मोठा परिणाम होईल.

COMMENTS