Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्लास चालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

पुणे ः क्लास चालकाने क्लासमध्येच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी क्लास चालकाविरुद्ध मुंढवा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सादीक

न्यायालयाचा निर्णय मान्य, विधिमंडळ यावर भूमिका घेईल
पीडितेची ओळख उघड करणे पडले महागात
संवाद हरवल्याने काँग्रेसची वाताहात!

पुणे ः क्लास चालकाने क्लासमध्येच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी क्लास चालकाविरुद्ध मुंढवा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सादीक महंमद बिडीवाले (वय 38, रा. श्रावस्तीनगर, घोरपडी,पुणे), असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या क्लास चालकाचे नाव आहे. याबाबत एका 15 वर्षीय पीडित मुलीने मुंढवा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी बिडीवाले हा घोरपडीतील श्रावस्तीनगर परिसरात खासगी क्लास चालवतो. त्याच्या क्लासचे नाव एस. एस. क्लासेस असून पीडित 15 वर्षीय मुलगी त्याच्याकडे क्लासला जात होती. मागील महिनाभरापासून बिडीवाले पीडित मुलीशी वारंवार अश्‍लील वर्तन करत होता. 26 ऑगस्ट रोजी बिडीवालेने मुलीची परीक्षा घेण्याच्य बहाण्याने तिला क्लासमध्ये उशिरापर्यंत जाणीवपूर्वक थांबविले. परीक्षा घेण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याशी जवळीक साधत अश्‍लील कृत्य केले. मुलीने या प्रकाराची माहिती पालकांना दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिने मुंढवा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

COMMENTS