Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोयाबीन व कापूस अनुदान पात्र शेतकर्‍यांनी अर्ज दाखल करावे

आमदार आशुतोष काळे यांचे शेतकर्‍यांना आवाहन

कोपरगाव : 2023 च्या खरीप हंगामात सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्‍यांना महायुती शासनाने आर्थिक मदत देण्याचे जाहीर केलेले आहे. कोपरगाव मतदार संघातील

लाडक्या बहिणींचे पैसे कर्ज खात्यात जमा करू नका
आदिवासींच्या विकासासाठी 8.81 कोटींचा निधी मंजूर
आ. आशुतोष काळेंनी मुस्लीम बांधवांना दिल्या ’बकरी ईदच्या’ शुभेच्छा

कोपरगाव : 2023 च्या खरीप हंगामात सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्‍यांना महायुती शासनाने आर्थिक मदत देण्याचे जाहीर केलेले आहे. कोपरगाव मतदार संघातील ज्या शेतकर्‍यांनी 2023 च्या खरीप हंगामात सोयाबीन व कापसाचे पिक घेतले होते अशा अनुदानास पात्र असणार्‍या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी अनुदानासाठी आवश्यक कागदपत्र जोडून आपले अर्ज दाखल करावेत असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
अगोदरच अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव मतदार संघात 2023 च्या खरीप हंगामात कमी पर्जन्यमान होवून सोयाबीन, कापसाचे उत्पन्न घटले असतांना सोयाबीन व कापसाचे दर देखील घटले होते. त्यामुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. याची महायुती शासनाने दखल घेवून शेतकर्‍यांचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी महायुती शासनाने शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी शेतकर्‍यांसाठी अर्थसंकल्पात इतरही महत्वाच्या घोषणा केल्या होत्या. त्यामध्ये 2023 च्या खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्‍यांना प्रती हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. ज्याप्रमाणे माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा करून प्रत्यक्षात अंमलात देखील आणली त्याप्रमाणेच  सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याच्या निर्णयाची देखील अंमलबजावणी सुरु झाली आहे.कोपरगाव मतदार संघात जवळपास 45 हजार सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी असून त्यांना हि आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेचे अर्ज भरून देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याकडे अर्ज उपलब्ध असून शेतकर्‍यांनी तातडीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपले अर्ज भरू द्यावेत जेणेकरून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात आर्थिक सहाय्य जमा करण्यास सोयीचे होणार आहे. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले असून लाडकी बहिण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार्‍या महायुती शासनाने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्‍यांना दिलेला शब्द यानिमित्ताने पूर्ण होणार असल्याचे म्हटले आहे.

COMMENTS