Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रक्षाबंधनासाठी गावी जाणे पडले महागात

साडेतीन लाखाचा ऐवजावर चोरट्यांनी मारला डल्ला

जामखेड ः जामखेड शहरातील मोरे वस्ती येथे रक्षाबंधनासाठी गावी गेलेल्या गळगटे कुटुंबीयांच्या बंद घराचे कुलूप तोडुन अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 30 हजार र

संजीवनीचा एमएचटी-सीईटी परीक्षेत उत्कृष्ट निकाल
संत नामदेव महाराज शिंपी समाजाची बैठक उत्साहात
राहुरी तालुक्यातील वकिल दाम्पत्यांचे अपहरण करून खून

जामखेड ः जामखेड शहरातील मोरे वस्ती येथे रक्षाबंधनासाठी गावी गेलेल्या गळगटे कुटुंबीयांच्या बंद घराचे कुलूप तोडुन अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 30 हजार रुपये रोख व 1 लाख 20 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. गळगटे यांच्या घरात तीन महीन्यात दुसर्‍यांदा चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी अहमदनगर येथील श्‍वान पथकास पाचारण करण्यात आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी गणेश दत्तात्रय गळगटे रा. साई नगर, मोरे वस्ती, ता जामखेड हे दि. 18ऑगस्ट 2024 रोजी बीड येथे रहात असलेला त्यांचा भाऊ प्रभाकर दत्तात्रय गळगटे यांच्याकडे रक्षाबंधनाच्या सणा निमित्त आपल्या कुटुंबा समवेत गेले होते. यावेळी दि 19 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा दरवाजाच्या कोयंडा व कुलूप तोडून घरातील बेडरूम मधील लाकडी कपाटातील रोख 2 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम व 1 लाख 20 हजार रुपयांचे लहान मुलांचे दोन तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. फिर्यादी गणेश दत्तात्रेय गळगटे  रक्षाबंधनाचा कार्यक्रमानंतर दि 19 रोजी संध्याकाळी  जामखेड येथील घरी आल्यानंतर त्यांना घराचा कोयंडा तुटलेला दिसला व घराममध्ये जाऊन पाहिले असता आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर  त्यांनी तातडीने जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेतली. दाखल फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी श्‍वान पथकास पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. जितेंद्र सरोदे हे करत आहेत.

तीन महिन्यात गळगट्टे कुटुंबियांच्या घरात दुसर्‍यांदा चोरी – तीन महिन्यांपूर्वी सदर गळगटे कुटुंबीयांच्या घरी 9 मे 2024 रोजी बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 24 हजार 679 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेला तीन महिने होत नाही तोच पुन्हा गळगटे यांच्या घरी साडेतीन लाखांची चोरी झाली आहे.

COMMENTS