Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाचा राहुरीत मोर्चा

देवळाली प्रवरा : रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने राहुरी शहरातून टाळ मृदूंगाच्या निनादात तहसिल कचेरीवर मोर्च नाशिक येथील

सरकारचं दोन वर्षाचं काम लई भारी : लोककला पथकांचा जागर सुरू
सिद्धटेक ग्रामपंचायतीत सत्तांतर
नेवाशात गौरी सजावट स्पर्धेचा सोहळा उत्साहात

देवळाली प्रवरा : रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने राहुरी शहरातून टाळ मृदूंगाच्या निनादात तहसिल कचेरीवर मोर्च नाशिक येथील सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात अखंड सप्ताह मध्ये सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांचे प्रवचन आयोजित केले होते 15 ऑगस्ट रोजी रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले.
आपल्या प्रवचनांमध्ये मोहम्मद पैगंबराच्या वैयक्तिक आयुष्य विषयी टिप्पणी केली, तसेच त्यांनी बांगलादेशातील हिंदू समाजावर होणार्‍या अत्याचारावरून भारतातल्या हिंदू समाजाला मजबूत राहण्याचे आवाहनही केले होते. रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काही तासानंतर त्यांच्या प्रवचनाचे व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ठीक ठिकाणी त्याचे पडसाद उलटायला सुरुवात झाली मुस्लिम समाजाने रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी केली, मुस्लिम समाज याबाबत अधिक आक्रमक झाला होता काही ठिकाणी रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने राहुरी शहरातील आनंद ऋषी गार्डन येथून दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहुरी शहरातून भजन कीर्तनाचा टाळ मृदंगाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता कि जय, अशा घोषणा देत तहसील कचेरीवर मोर्चा आणला होता. तहसील कचेरी समोर राजेश्‍वरानंद महाराज कुर्‍हे, आदिनाथ महाराज दुशिंग, अर्जुन महाराज तनपुरे, संपत महाराज जाधव, पोपट महाराज कुसमुडे, बाबा महाराज मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या नंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व नायब तहसीलदार सचिन औटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोर्चाच्या वेळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

COMMENTS