लसीचा साठा संपल्याने सातारा जिल्ह्यात कोरोना लसीकरण बंद : मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लसीचा साठा संपल्याने सातारा जिल्ह्यात कोरोना लसीकरण बंद : मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा

सातारा जिल्ह्यातील 45 वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व व्यक्तींचे कोविड-19 लसीकरणाची मोहिम प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये सुरु करण्यात आली आहे.

स्वतःच्याच कारखान्यात यंत्रमागात साडी अडकून महिला ठार
शिवानी, तू खुश राहा, चिठ्ठी लिहून पतीची आत्महत्या
बालसंस्कार शिबिरे ही काळाची गरज ः श्री भास्करगिरीजी महाराज

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील 45 वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व व्यक्तींचे कोविड-19 लसीकरणाची मोहिम प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये सुरु करण्यात आली आहे. जास्तीत-जास्त लोकांची नोंदणी व लसीकरण व्हावे यासाठी प्रशासनामार्फत व्यापक नियोजन करण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 2 लाख 56 हजार 434 एवढे लसीकरण पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत लसीचा साठा संपलेला असल्यामुळे उद्यापासून लसीचा साठा उपलब्ध होईपर्यंत लसीकरण मोहिम थांबवावी लागत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले आहे.

1 एप्रिलपासून जिल्ह्यामध्ये 45 वर्षावरील सरसकट व्यक्तींना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात प्रशासनाच्यावतीने प्रभावी नियोजन करुन नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण केल्यामुळे नागरिकांनी लसीकरणासाठी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. लसीची मागणी शासनस्तरावर नोंदविण्यात आली आहे. लस उपलब्ध होताच लसीकरणाची मोहिमपुन्हा वेगाने प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी सांगितले.

COMMENTS