Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाडोबाला आरटीओने दिले वाहन चालवण्याचे धडे

पुणे : पुण्यात कल्याणीनगर येथे मे महिन्यात एका बिल्डर पुत्राने पोर्शे कार चालवत दुचाकीवरून जाणार्‍या दोघांना धडक दिली होती. या घटनेत दोन अभियांता

जितेंद्र आव्हाडांच्या कार्यक्रमापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये राडा | LOKNews24 | LOKNews24
पुरवठा अधिकार्‍याच्या खुर्चीचा ताबा घेतला सेल्समनने
ऐतिहासिक भिडे वाडा जमीनदोस्त

पुणे : पुण्यात कल्याणीनगर येथे मे महिन्यात एका बिल्डर पुत्राने पोर्शे कार चालवत दुचाकीवरून जाणार्‍या दोघांना धडक दिली होती. या घटनेत दोन अभियांता असलेल्या तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील लाडोबा सध्या जामीनावर असून त्याला कोर्टाने 300 शब्दांत निबंध व आरटीओचा रोड सेफ्टी प्रोग्राम करायला लावला होता. मुलाकडून 300 शब्दाचा निबंध लिहून घेण्यात आला होता. त्यानंतर आता आरटीओने रोड सेफ्टी प्रोग्राम अंतर्गत वाहन चालवण्याचे प्रशिक्षण आणि वाहतूक नियमांची माहिती दिल्याचे वृत्त आहे. या संदर्भात आरटीओच्या अधिकार्‍यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे.
कल्याणीनगर येथे 19 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाच्या भरधाव ‘पोर्शे’ कारच्या धडकेत एक तरूण आणि एका तरूणीचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. कल्याणीनगर येथे 19 मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने ‘पोर्श’ कार भरधाव चालवून दुचाकीस्वार सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण-तरुणींना उडविले होते. त्यामध्ये या तरुण-तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला होता. मुलाला 15 तासांत जामीन देण्यात होता. यामुळे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. मात्र त्यावेळी त्याच्या इतर दोन मित्रांचे देखील रक्ताचे नमुने बदलल्याची माहिती आता समोर आली आहे. एवढेच नाही तर त्यासाठी अल्कोहोल नसलेल्या कापसाचा वापर करण्यात आला असून, थेट सीएमओ (मुख्य वैद्यकीय अधिकारी) अधिकार्‍याच्या रेस्ट रुममध्ये हे रक्त नमुने बदलण्यात आले आहेत. कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

आरटीओने काय दिले प्रशिक्षण ?जामिनावर बाहेर आलेल्या मुलाकडून 300 शब्दांचा निबंध लिहून घेण्यात आला होता. या प्रकरणी देखील मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. तसेच मुलाने निबंधांत काय लिहिले याची माहिती उघड करण्यात आली नाही. दरम्यान, आता या प्रकरणी आणखी एक महत्वाची अपडेट आली आहे. आरटीओने आरोपी तरुणाला वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले आहे. रोड सेफ्टी अंतर्गत हे ट्रेनिंग देण्यात आले आहे. यात वाहतुकीची नियमावली, वाहन चालवताना घ्यायची काळजी, आरटीओकडून कशी कारवाई केली जाते या सारख्या अनेक गोष्टीचे धडे त्याला देण्यात आले आहे.

COMMENTS