नवी दिल्ली / प्रतिनिधी : पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी यांना पदावरून युपीएससीने हटविल्यानंतर दिल्ली येथील पटीय
नवी दिल्ली / प्रतिनिधी : पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी यांना पदावरून युपीएससीने हटविल्यानंतर दिल्ली येथील पटीयाला न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. तो अटकपूर्व जामीन नामंजूर केल्यानंतर पुजा खेडकर अटकेची कारवाई टाळण्यासाठी दिल्लीतून पसार झाल्या आहेत.
प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पुजा खेडक यांच्या मेडिकलच्या शिक्षणासह अपंगत्वाच्या खोट्या दाखल्याच्या पडताळणीनंतर राज्य सरकारसह युपीएससीने पदावरून दूर केले. त्या प्रकारानंतर न्यायालयाने युपीएससीने नियुक्त केलेल्या सर्व अधिकार्यांचे अपंगत्व प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलिएर सादर करणार्यांची करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्ली येथील पटीयाला येथील न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर पुजा खेडकर पसार झाल्या आहेत. त्या कारवाई टाळण्यासाठी दुबईला पळून गेल्या असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वरच्या न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करु शकतात. त्यासाठी अटक टाळण्यासाठी पळून गेल्या असल्याची शक्यता आहे. भादंविच्या कलम 420 च्या नुसार दिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संघटीत गुन्हेगारीबाबत चौकशी करण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकारने बनवलेल्या समितीसमोर लैंगिक शोषन व वर्ग 1 च्या अधिकार्याला अल्प उत्पन्नाचे प्रमाणपत्र कसे मिळाले, असे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत.
COMMENTS