Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणाचा प्रश्‍न राज्यात नव्हे केंद्रात सुटेल

उद्धव ठाकरे ः सर्व पक्षीय नेत्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेण्याचे आवाहन

मुंबई ः मराठा आंदोलकांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान मातोश्रीसमोर आंदोलन करत उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करण्याची

राज्यात भाजपने मारली बाजी… मात्र, महाविकास आघाडी मिळून जिंकले जास्त उमेदवार
नाकर्त्या ठाकरे सरकारचा शेतकरीद्रोही चेहरा उघड : राम शिंदे
राज्यातील जनतेला फसवण्याचा धंदा उद्धव ठाकरेंनी सुरू केला आहे काय…? (Video)

मुंबई ः मराठा आंदोलकांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान मातोश्रीसमोर आंदोलन करत उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला होता. मराठा समाजाचे मत घ्यायचे, त्यांच्या प्रश्‍नांवर राजकारण करायचे हीच राजकीय पक्षाची भूमिका असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रमेश केरे यांनी केला. त्यानंतर या आंदोलकांच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्‍न राज्यात सुटणारा नसून, तो केंद्रातच सुटेल, त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यावी, त्याला आपला पाठिंबा असेल असे ठाकरे म्हणाले.

मराठा आंदोलकांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले की, आपण मराठा समाजाच्या सोबत असून हा प्रश्‍न राज्यात सुटणार नसल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यासाठी आपण सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत दिल्लीला नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी तयार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण हवे असेल तर आमच्यासोबत दिल्लीत मोदींना भेटण्याची चला. केंद्रात आरक्षणाची मर्यादा वाढवली तरच मराठा समाजाला न्याय मिळेल असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. मोदींना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी भेटावे, ते जो तोडगा काढतील त्याला आमचा पाठिंबा असेल, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मराठा समाजातील वेगवेगळ्या संघटना आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यातील एका संघटनेचे पदाधिकारी उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले असतील तर त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी तात्काळ भेटायला पाहिजे होते. पण ते का भेटले नाहीत, याचे कारण स्पष्ट आहे. उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाला कोणत्याही संघटनेला मातोश्री बाहेर पाठवण्याची आवश्यकता नाही. आम्ही सुरुवातीपासूनच याबाबत स्पष्ट भूमिका मांडली असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

आंदोलकांचा मातोश्रीबाहेर आक्रमक पवित्रा   – मराठा क्रांती मोर्चोचे कार्यकर्ते मातोश्रीबाहेर असताना आदित्य ठाकरे मात्र, मातोश्रीवरुन बाहेर पडले आहेत. त्यांनी आंदोलकांची भेट घेणे टाळले आहे. यावर आंदोलकांनी देखील कोणतीच भूमिका घेतली नाही. पक्ष प्रमुख म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांनाच भेटणार आहे. त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी, असे आवाहन मराठा आंदोलकांनी केले आहे. त्यानंतर अंबादास दानवे यांनी मध्यस्थी केल्यानंतर पाच आंदोलकांचे शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट चर्चा केली.

आंदोलकांना प्रवीण दरेकरांनी पाठवले ः मनोज जरांगे – मराठा समाजाचे सध्या कोणतेच आंदोलन सुरू नाही. त्यामुळे मातोश्री बाहेर आंदोलन करणार्‍या मराठा कार्यकर्त्यांनी मागे यावे, त्यांना प्रवीण दरेकर यांनी पाठवले असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. मात्र, प्रवीण दरेकर यांना हे परवडणार नाही. मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. अशा प्रकारचे आंदोलन करणारे मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत असल्याचा आरोप देखील मनोज जरांगे यांनी केला आहे.

COMMENTS