Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रशिक्षणार्थी महिला पोलिसाची आत्महत्या

नागपूर प्रशिक्षण केंद्रातील घटना

नागपूर ः येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी महिला पोलिस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. यामुळे प्रशिक्षण केंद्रात खळबळ म

हिंगोलीत शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या
महागडा मोबाईल न घेतल्याने तरुणाची आत्महत्या

नागपूर ः येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी महिला पोलिस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. यामुळे प्रशिक्षण केंद्रात खळबळ माजली आहे. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली असून त्यात लिहिले आहे की, आपण आत्महत्या केल्याचे आईला सांगू नका. या घटनेमुळे नागपुरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात खळबळ उडालेली आहे.
प्रतीक्षा भोसले असे आत्महत्या केलेल्या प्रशिक्षणार्थी पोलिस शिपायाचे नाव आहे. ती नागपूरच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होती. प्रतीक्षा मूळची पुणे जिल्ह्यातील होती तसेच ती विवाहित असल्याचे समजते. प्रतीक्षाने प्रशिक्षण केंद्राच्या वसतीगृहात असणार्‍या पाण्याच्या टाकीच्या लोखंडी पायर्‍यांना गळफास घेत आत्महत्या केली. यावर्षी फेब्रुवारीपासून ती नागपूरच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होती. प्रतीक्षा गेल्या काही दिवसापासून नैराश्येत असल्याचे म्हटले जात आहे. या कौटुंबिक नैराश्यातूनच तिने आपले जीवन संपवले असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. महिला शिपायाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. या चिठ्ठीत तिने म्हटले आहे की,’मी आत्महत्या केल्याचे माझ्या आईला कळू देऊ नका. या चिठ्ठीवरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. प्रतीक्षाने 8 जूलै रोजी आत्महत्या केली होती. मात्र ही घटना मंगळवारी (9 जुलै) रोजी सकाळी उघडकीस आली.

COMMENTS