Homeताज्या बातम्यादेश

ओवेसी यांच्या घरावर फेकली काळी शाई

नवी दिल्ली ः हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घरावर काळी शाई फेकण्यात आली आहे. त्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आणि खासदारांचा

सुप्रिया सुळे यांच्या टीकेवर विखे पाटील यांचं उत्तर
पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरेयांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी
Shirdi : शिर्डीला दर्शनासाठी जात असाल तर आधी नवी नियमावली जाणून घ्या |

नवी दिल्ली ः हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घरावर काळी शाई फेकण्यात आली आहे. त्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आणि खासदारांचा बंगलाही सुरक्षित नसल्याचे सांगितले. माझ्या घराला लक्ष्य करणार्‍या गुंडांना मी घाबरत नाही, असे ओवेसी म्हणाले. हिम्मत असेल तर मला सामोरे जा. शाई फेकल्यानंतर किंवा दगड फेकल्यानंतर पळून जाऊ नका. सावरकरांसारखा भ्याडपणा करणे बंद करा. दिल्लीतील माझ्या घराला किती वेळा टार्गेट करण्यात आले हे मोजायला आता मी विसरलो असल्याचे ते म्हणाले. 

COMMENTS