Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थकीत कर्ज वसुलीसाठी घर सील

अनाधिकृतपणे सील तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

देवळाली प्रवरा ः थकीत कर्ज वसूलीसाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने राहुरी तालूक्यातील त्रिंबकपूर येथील कोळसे वस्ती येथील एक घर सील करण्यात आले होत

प्रदीर्घ चौकशीनंतर अनिल देशमुखांना अटक
एकही पात्र लाडकी बहिण योजनेपासून वंचित राहणार नाही
देशहितवादीचे येत्या रविवारी बाळासाहेब थोरातांच्या हस्ते प्रकाशन

देवळाली प्रवरा ः थकीत कर्ज वसूलीसाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने राहुरी तालूक्यातील त्रिंबकपूर येथील कोळसे वस्ती येथील एक घर सील करण्यात आले होते. मात्र कर्जदारांनी अनाधिकृतपणे सदर सील तोडून घरावर ताबा घेतला. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात दोघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
            याबाबत समजलेली माहिती अशी की,किशोर ईश्‍वरलाल पाटील, वय 48 वर्षे, रा. कोथरुड, ता. हवेली, जि. पुणे, हे अल्टम क्रेडो होम फायनान्स प्रा. लि. सी. टी. एस. नं. 1074, प्लॉट नं. 426/1 गोखले रोड, मॉडेल कॉलनी पुणे येथे वरिष्ठ अधिकारी म्हणुन नोकरीस आहे.त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, फायनान्स कंपनीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून राहुरी तालूक्यातील त्रिंबकपुर येथील कोळसे वस्ती येथील बाबासाहेब शिवाजी कोळसे व शिवाजी यादव कोळसे यांचे नावावर असलेल्या गट नं. 67/2/2 ग्रामपंचायत मिळकत 165 चे क्षेत्रफळ 3 हजार चौ. फुट त्यावर आरसीसी बांधकाम या मिळकत 13 मार्च 2024 रोजी ताब्यात घेऊन सील केली होती. 19 एप्रिल 2024 रोजी फायनान्स कंपनीचे ताब्यात घेतलेल्या मिळकतीची पाहणी करण्यासाठी किशोर पाटील काल गेले होते. सदर ठिकाणी कर्जदार यांनी घराचे सील तोडुन आत प्रवेश करुन वास्तव्यास असल्याचे दिसून आले. किशोर ईश्‍वरलाल पाटील यांनी काल राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बाबासाहेब शिवाजी कोळसे व शिवाजी यादव कोळसे, दोघे रा. कोळसे वस्ती, त्रिंबकपूर, ता. राहुरी, यांच्यावर गून्हा रजि. नं. 740/2024 भादंवि कलम 447 प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहे.

COMMENTS