Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ब्राम्हणीतून एकाची मोटारसायकल पळवली

देवळाली प्रवरा ः मेडीकलमधून औषधे घेवून येतो, थोडा वेळ मोटरसायकल द्या. असे सांगून रामेश्‍वर खिल्लारे या भामट्याने नवनाथ कटारे यांची मोटारसायकल घेऊ

पस्तीस लाख रुपये किंमतीचे मुद्देमालासह वेहिशोबी साठ किलो चांदी जप्त
गडहिंग्लज अर्बन बँके च्या “13 कोटी”अपहारातील दोघाना अटक! l पहा LokNews24
आत्मा मालिक रुग्णालयात कोरोना रुग्णांस विनामुल्य सल्ला

देवळाली प्रवरा ः मेडीकलमधून औषधे घेवून येतो, थोडा वेळ मोटरसायकल द्या. असे सांगून रामेश्‍वर खिल्लारे या भामट्याने नवनाथ कटारे यांची मोटारसायकल घेऊन पसार झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे घडली. नवनाथ भानुदास कटारे, वय 35 वर्षे, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नवनाथ कटारे यांच्याकडे होंडा कंपनीची शाईन मॉडेलची एम एच 17 सी एस 5316 असा नंबर असलेली मोटारसायकल आहे.
             राहुरी ते शिगणापुर रोडवर ब्राम्हणी येथे हॉटेल शेतकरी या नावाने हॉटेल आहे. सदर हॉटेलवर रामेश्‍वर सिताराम खिल्लारे हा वेटर म्हणुन काम करतो. नवनाथ कटारे हे त्या हाँटेलवर सतत जात येत असल्याने त्यांची व रामेश्‍वर याची ओळख होती.होती नवनाथ कटारे हे त्यांची मोटारसायकल घेऊन हॉटेल शेतकरी येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी मोटारसायकल हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावली होती. त्यानंतर काही वेळात हॉटेलवर काम करणारा वेटर रामेश्‍वर सिताराम खिल्लारे हा नवनाथ कटारे यांना म्हणाला की, मला थोडा वेळ तुमची मोटारसायकल द्या, मी गावातुन मेडिकल मधुन औषधे घेवुन येतो. कटारे यांनी त्याला मोटारसायकल दिली. त्यानंतर आरोपी रामेश्‍वर खिल्लारे हा मोटारसायकल घेवुन पसार झाला. नवनाथ कटारे यांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो मिळुन आला नाही. घटनेनंतर नवनाथ भानुदास कटारे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी रामेश्‍वर सिताराम खिल्लारे, रा. जामठी, ता. सोनगाव, जि. हिंगोली, याच्यावर गून्हा रजि. नं. 724/2024 भादंवि कलम 406 प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला.

COMMENTS