Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्योतिषी वामन रंगनाथ महाजन यांचा सन्मान

अकोले ः अकोले तालुक्यातील कोतुळ येथील ज्योतिषी वामन रंगनाथ महाजन तथा नाना महाजन यांचा पुणे येथे पार पडलेल्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनात सन्मान

सतराशे किलोचे गोमांस पोलिसांनी केले जप्त
स्वच्छता सर्वेक्षणात नगर राज्यात दुसरे व देशात 32 वे
नगर अर्बन बँकेत पैसे जमा करू नका

अकोले ः अकोले तालुक्यातील कोतुळ येथील ज्योतिषी वामन रंगनाथ महाजन तथा नाना महाजन यांचा पुणे येथे पार पडलेल्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनात सन्मान करण्यात आला. पुणे येथे नुकतेच अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन पार पडले. श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव आयोजित अभिजीत प्रतिष्ठान, द इन्स्टिट्यूट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट, मुंबई, द लीला टॅरो, पुणे प्रायोजित या अधिवेशनाचे हे चौथे वर्ष होते. या अधिवेशनात नगर जिल्ह्यातील कोतुळ (ता.अकोले)येथील प्रख्यात ज्योतिषी श्री वामन रंगनाथ महाजन उर्फ नाना महाजन यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन ज्योतिषाचार्या डॉ. जोशी यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

COMMENTS