Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

95 लाखांची रोखड जप्त; सातारा तालुक्यातील घटना

सातारा / प्रतिनिधी : सातारा तालुका पोलिसांनी शेंद्रे, ता. जि. सातारा येथे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठी कारवाई करत सुमारे 95 लाख रुपयां

शेंद्रे-कागल महामार्गाच्या टोलवसुलीसाठी 53 दिवसांची मुदतवाढ
वडी येथील युवकाचा खून; चौघांना अटक; एकजण फरार
वीरनारी शेतकरी उत्पादन कंपनीला भारतीय सेनेचे बहुमूल्य योगदान

सातारा / प्रतिनिधी : सातारा तालुका पोलिसांनी शेंद्रे, ता. जि. सातारा येथे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठी कारवाई करत सुमारे 95 लाख रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम मनोज गोयल आणि दीपू चव्हाण यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आली. ते वाशी (नवी मुंबई) येथून हुबळी (कर्नाटक) येथे पांढर्‍या रंगाच्या क्रेटा कार (क्रमांक एमएच 48 सीटी 5239) मध्ये प्रवास करत होते.
विश्‍वसनीय माहिती मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी त्वरित दखल घेतली. प्राथमिक चौकशीत असे उघड झाले आहे की, ही रक्कम वाशी टोल प्लाझावर यांना सुपूर्द केली होती. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे आणि जप्त केलेल्या रकमेचा स्त्रोत व उद्देश शोधण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. ही कारवाई सातारा पोलिसांचे कायदा व सुव्यवस्था राखण्यासह अवैध आर्थिक व्यवहारांना आळा घालण्याच्या कटिबध्दतेचे प्रतीक आहे. संपूर्ण कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण आणि पंचनामा संयुक्तपणे सातारा पोलीस, एफएसटी, आयटी डिपार्टमेंट आणि इतर डिपार्टमेंट करत आहे.

COMMENTS