Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडीचा संघ अव्वल, जिल्हास्तरासाठी झाली निवड

मुखेड प्रतिनिधी - महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या मैदानावर तालुका क्रीडा स्पर्धांना प्रारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिने य

बनावट ‘आधार कार्ड’ वर बसणार चाप, सरकारनं घेतला मोठा निर्णय
सिंदी शहरात नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा 
ज्येष्ठ साहित्यिक  डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

मुखेड प्रतिनिधी – महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या मैदानावर तालुका क्रीडा स्पर्धांना प्रारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिने यांच्या शुभहस्ते करण्यात आला . पहिल्याच दिवशी क्रिकेट या क्रीडा प्रकारात माध्यमिक आश्रम शाळेच्या संघाने शाहीर अण्णाभाऊ साठे शाळेच्या संघावर मात करीत अत्यंत रोमांचकारी झालेल्या अंतिम सामन्यात अव्वल स्थान पटकाविले असून सदर संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
     महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या मैदानावर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी क्रिकेट या क्रीडा प्रकारात ऑसम इंग्लिश स्कूल शाळेच्या संघावर मात करीत माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडीच्या संघाने उपांत फेरीचा सामना जिंकून अंतिम फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला. यानंतर झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये शाहीर आण्णाभाऊ साठे शाळेच्या संघाविरुद्ध पाच षटकांचा अंतिम सामना खेळविण्यात आला. यावेळी शाहिर भाऊ साठे शाळेच्या संघाने 42 धावा पूर्ण करून माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडीच्या संघाला जिंकण्यासाठी 43 धावांचे आव्हान दिले होते. कमळेवाडीची सुरुवात  निराशाजनक झाली असून पहिल्या दोन षटकांमध्ये आठ धावावर सात गडी बाद अशी अवस्था झाली होती. 18 चेंडूवर 35 धावांची गरज असताना माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडी संघाचा अष्टपैलू खेळाडू बालाजी गोकुळे, व्यंकट चव्हाण,प्रदीप राठोड यांच्या चमकदार कामगिरीमुळे अत्यंत अवघड अशक्य असणारे आव्हान चार चेंडू राखून त्यांनी पूर्ण केले. अत्यंत रामहर्षक तथा रोमांचकारी झालेल्या सामन्यामध्ये अत्यंत उत्तम कामगिरी करणार्‍या बालाजी गोकुळे या खेळाडूस सामनावीराचा बहुमान मिळाला तर गोलंदाजीमध्ये आश्रम शाळेचा कर्णधार मारुती पांचाळ यांने आपल्या चमकदार कामगिरीचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक संदीप गेटकेवार, श्री पंडित श्रीराम, किरण विराळे, जाधव सर आदींनी मैदानावर हजेरी लावून विजय संघाच्या खेळाडूंची व त्यांचे प्रशिक्षक सिद्धांत कांबळे आणि संदीप गुंटूरकर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.  अंतिम सामन्याचे पंच म्हणून कृष्णा जक्केवाड,ओमप्रकाश चौधरी,विष्णू चव्हाण यांनी काम पाहिले. माध्यमिक आश्रम शाळेचा क्रिकेटचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या यशाबद्दल संस्थेचे सचिव गंगाधर राठोड,आ.डॉ.तुषार राठोड, संस्थेचे सन्माननीय सदस्य संतोषभाऊ राठोड आदींनी विजयी संघाचे अभिनंदन करून पुढील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS