Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेट्रोलपंप कामगाराने मालकाला घातला 28 लाखांचा गंडा

पुणे/प्रतिनिधी ः एका कंपनीच्या मालकाने त्याच्या दोन वाहन चालक यांना पेट्रोल व डिझेल भरण्याकरिता विश्‍वासाने सोपवलेले अमेरीकन एक्सप्रेस प्लॅटीनियम

नेवाशात तिघांची 35 लाखांची फसवणूक
पुण्यातील व्यावसायिकाची एक कोटी 17 लाखांची फसवणूक
सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकास साडेसात लाख रुपयांचा गंडा

पुणे/प्रतिनिधी ः एका कंपनीच्या मालकाने त्याच्या दोन वाहन चालक यांना पेट्रोल व डिझेल भरण्याकरिता विश्‍वासाने सोपवलेले अमेरीकन एक्सप्रेस प्लॅटीनियम या कंपनीचे क्रेडीट कार्डचा पेट्रोलपंप कामगाराशी संगनमत करुन गैरवापर करत सुमारे 28 लाख 84 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तीन आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
राजेंद्र सुगणचंद भवर (रा.वडगावशेरी, पुणे), नितीन गोरख खरात (रा. येरवडा,पुणे) व बाणेर येथील माऊली पेट्रोल पंपावरील काम करणारे प्रकाश नावाचे इसम व सदर पंपावरील त्यास साथ देणारे मॅनेजर व मालक यांचेवर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा प्रकार जानेवारी 2023 ते जून 2023 यादरम्यान घडलेला आहे. याप्रकरणी कपील सुभाष पाटील (वय-44,रा. बाणेर, पुणे) यांनी पोलिसांकडे आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांचे कंपनीचे चेअरमन कीशोरीलाल रामरायका यांचेकडे आरोपी राजेंद्र भवर व नितीन खरात हे दोघे चालक म्हणून काम करत होते. त्यांना गाडीत पेट्रोल व डिझेल भरण्याकरिता विश्‍वारसाने क्रेटीड कार्ड देण्यात आले होते. मात्र, त्यांनी बाणेर येथील माऊली पेट्रोल पंपाचे मालक, मॅनेजर व कामगार यांच्याशी संगनमत करुन 28 लाख 84 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. निलज्योती रस्ता येथे राहणार्‍या 33 वर्षीय एका तरुणीला अज्ञात व्हॉटसअप क्रमांकावरुन आरोपीने संर्पक करुन, स्वत:ची ओळख लपवून पर्ट टाईम नोकरी देण्याचे अमिष दाखवले. तक्रारदार तरुणीचा विश्‍वास संपादन करुन त्यांच्याकडील टास्क विकत घेण्याच्या नावाखाली, स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी तरुणीकडून वेळोवेळी वेगवेगळया बँक खात्यात एकूण दोन लाख सहा हजार रुपये घेतले गेले. तक्रारदार हिने केलेल्या कामाचा कोणताही परतावा तसेच तिने दिलेले मुळ रक्कम परत न करता तिची सदर रकमेची आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे. यबााबत अनोळखी मोबाईल क्रमांक धारक व बँक वापरकर्ते यांचेवर चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

COMMENTS