Homeताज्या बातम्यादेश

दिल्ली, पंजाबसह हरियाणात भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली/प्रतिनिधी : राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यात भूकंपाचे धक्के बघायला मिळत आहे. त्यातच शनिवारी पहाटेच्या सुमारास राजधानी दिल्

लडाखमध्ये पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के
तैवानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप
राजधानीत भूकंपाचे तीव्र धक्के

नवी दिल्ली/प्रतिनिधी : राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यात भूकंपाचे धक्के बघायला मिळत आहे. त्यातच शनिवारी पहाटेच्या सुमारास राजधानी दिल्ली, पंजाब आणि हरयाणात 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची घटना समोर आली आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास दिल्लीत भूकंप झाला असून त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्ली, पंजाब आणि हरयाणा या तीन राज्यात पहाटे चार वाजेच्या सुमारास जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हरयाणातील रोहतक असल्याची माहिती आहे. भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. पहाटे लोक साखरझोपेत असताना भूकंप झाला, त्यानंतर झोपेतून उठलेल्या लोकांनी मोकळ्या जागेवर धाव घेतली. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने त्यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि हरयाणा या उत्तर भारतातील राज्यांमध्ये गेल्या महिन्याभरात चारवेळा भूकंप झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिल्ली ही राष्ट्रीय राजधानी असल्याने देशविदेशातील अनेक नेते, पर्यटक आणि लोक शहरात येत असतात. त्यामुळे राजधानीत भूकंप झाल्याची घटना समोर आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. पंजाब आणि हरयाणा या राज्यांमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहे. भूकंपाचे केंद्र असलेल्या रोहतक या ठिकाणी जास्त वित्तहानी झाल्याची माहिती समोर आली आहे.

महिन्याभरात चौथ्यांदा भूकंपाचे धक्के – गेल्या 30 दिवसांत उत्तर भारतात चौथ्यांदा भूकंप झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटे भूकंप झाल्यानंतर अनेकांनी घरात जाणे टाळले, तसेच बाहेर मोकळ्या जागेवर वेळ घालवला. सुदैवाने या भूकंपाच्या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नसल्याची माहिती आहे. तरीदेखील भूकंपाच्या घटनेनंतर दिल्ली, पंजाब आणि हरयाणात मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

COMMENTS