Homeताज्या बातम्यादेश

नोटबंदीला 7 वर्षे पूर्ण

8 नोव्हेंबर हा दिवस सर्व भारतीयांच्या आठवणीत कायम राहणार आहे. मोदी सरकारने याच दिवशी नोटबंदी  ची घोषणा केली होती. 8 नोव्हेंबर 2016 रोजी सरकारने 5

गुजरातच्या रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक
पुण्यात क्रेडीट कार्ड काढून देण्याचे बहाण्याने चार लाखाचा गंडा
ट्रकांची हेराफेरी करणारा मास्टरमाईंड पोलिसांच्या ताब्यात | LOK News 24

8 नोव्हेंबर हा दिवस सर्व भारतीयांच्या आठवणीत कायम राहणार आहे. मोदी सरकारने याच दिवशी नोटबंदी  ची घोषणा केली होती. 8 नोव्हेंबर 2016 रोजी सरकारने 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे सर्वांना मोठा धक्का बसला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 8 वाजता जनतेला संबोधित केलं आणि ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. रातोरात नोटबंदीची घोषणा झाली. 500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्यात आल्या. यानंतरं एटीएम आणि बँकांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं.

मोदी सरकारच्या नोटबंदीला 7 वर्षे पूर्ण– 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता समोर आलेल्या एका बातमीने देश आणि जगाला धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना मध्यरात्री 12 पासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र, एका मर्यादित रकमेपर्यंत या नोटा बँकांमध्ये बदलता येतील, असंही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. नोव्हेंबर 2016 मध्ये जाहीर करण्यात आलेले नोटाबंदी, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि लोकांना त्यांच्या पेमेंटची पद्धत रोखीपासून डिजिटलमध्ये बदलण्यासाठी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला होता. लोकल सर्कलने मे 2023 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतातील एकूण किरकोळ डिजिटल पेमेंटमध्ये UPI चा वाटा 78 टक्क्यांहून अधिक होता. तज्ज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत भारतातील एकूण किरकोळ डिजिटल पेमेंटच्या 90 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असे सर्वेक्षणात समोर आलं आहे. 

COMMENTS