Homeताज्या बातम्यादेश

बंगळुरमध्ये 15 जणांचा होरपळून मृत्यू

फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत दुर्घटना

बंगळुरू/वृत्तसंस्था ः कर्नाटकाची राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये फटाक्यांच्या दुकानांना लागलेल्या आगीमध्ये 15 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आ

राज्यातील एसटी बससेवा सुरळीत
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लक्षवेधी टरबूज आंदोलन
हळदी समारंभासाठी रस्ता अडवला, नवरदेवावर गुन्हा

बंगळुरू/वृत्तसंस्था ः कर्नाटकाची राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये फटाक्यांच्या दुकानांना लागलेल्या आगीमध्ये 15 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनेत अन्य 4 जण जखमी झाले आहेत.  जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बंगळुरूच्या अणेकल तालुक्यातील अटीबेले येथील फटाक्यांच्या दुकानाला काल रात्री लागलेल्या आगीत मृतांची संख्या 15 वर पोहोचली आहे. अपघातात जखमी झालेल्या दोघांचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुकान मालकासह चार जणांना किरकोळ दुखापत झाल्याचे पोलिसांनी सुरुवातीला सांगितले होते. मात्र, आग विझवल्यानंतर दुकानात 12 मृतदेह आढळून आले. दसरा-दिवाळीसाठी फटाक्यांची साठवणूक केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. वाहनातून बॉक्स उतरवत असताना त्यांना आग लागली. त्यावेळीच आगीचा भडका उडाला. काही कळण्याआधी आगीने मोठा पेट घेतला. यातून स्वत:चा बचाव करण्यासाठी व्यक्ती इकडे तिकडे पळू लागले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी या घटनेबाबत ट्वीट केले आहे. आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सरकार 5 लाखांची आर्थिक मदत करणार असल्याचं जाहीर केले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही आग इतकी भीषण होती की, यामध्ये 15 जणांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. आगीमुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी एफएसएल टीम तयार करण्यात आली आहे.

COMMENTS