Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या धारावी कट्टा चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन कॅबिनेट मंत्री हाजी अराफत शेख यांच्या हस्ते संपन्न

पुणे प्रतिनिधी - बीड जिल्ह्याचे जावई आणि सोलापूरचे भूमीपूत्र दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या धारावी कट्टा चित्रपटाचा पोस्टर प्रकाशन सोहळा

पार्वताबाई बाबुराव आरोटे यांचे निधन
शरसंधान ! एसपी साहेब, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहात ‘का’? l पहा LokNews24
सनी देओल बेपत्ता? पठाणकोट मध्ये लागले पोस्टर्स

पुणे प्रतिनिधी – बीड जिल्ह्याचे जावई आणि सोलापूरचे भूमीपूत्र दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या धारावी कट्टा चित्रपटाचा पोस्टर प्रकाशन सोहळा कॅबिनेट मंत्री हाजी अराफत शेख यांच्या हस्ते देहूरोड पुणे येथे संपन्न झाला.
धारावी कट्टा या चित्रपटाचे पोस्टर उद्घाटन सोहळ्याचे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते. धारावी कट्टा या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन स्वतः अल्ताफ शेख यांनी केले असुन चित्रपटातील गाणीही त्यांनीच लिहिली आहेत. हा पोस्टर उद्घाटन सोहळा हाजी अराफत शेख कॅबिनेट मंत्री (दर्जा प्राप्त), अल्पसंख्यांक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी चंदेरी दुनियेतले अनेक दिग्गज तारे तसेच राजकीय व्यक्ती उपस्थित होते. सोबत धारावी कट्टा टीमनेही जल्लोष साजरा केला. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून अल्ताफ शेख यांना चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. या चित्रपटाविषयी अल्ताफ शेख यांनी म्हटले की,चित्रपटाची पार्श्वभूमी सांगितली धारावीतील चार शाळकरी मुलांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट असून त्यांच्यासोबत अशा काही विचित्र घडामोडी घडतात की ते इच्छेविरुद्ध गुन्हेगारी जगतात जातात. ह्याचे रंजक पण वास्तव या कथेच्या माध्यमातून लोकांना कळेल. हा चित्रपट हिंदी, कन्नड, तेलुगू या तीन भाषेत प्रदर्शित होणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनी जरूर पहावा असा हा चित्रपट आहे. सोबतच आणखी काही वास्तवदर्शी चित्रपट येणार आहेत. जे लोकांच्या पसंतीस उतरतील. ज्यात लोरी, बेतुका, कम ऑन विष्णू इत्यादी तसेच महाराष्ट्रातील एक ऋषितुल्य राजकीय व्यक्तिमत्त्व यांचा जीवनपट कर्मयोगी आबासाहेब असे विविध चित्रपटांची निर्माण सुद्धा करणार आहे.दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचा 2018 साली प्रदर्शित झालेला  वेडा बीएफ चित्रपटाने तिकीट खिडकीवर चांगलाच गल्ला गोळा केला होता. चित्रपट समीक्षकांनीही या चित्रपटाला एक चांगला चित्रपट म्हणून नावाजले होते तसेच चित्रपटाला नॅशनल अवार्ड मिळाले होते व त्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. या चित्रपटाने रसिकांच्या मनांमध्ये घर केलं होतं. आता दिग्दर्शक, लेखक, गीतकार, पटकथाकार, संवाद लेखक अल्ताफ शेख यांच्या लेखणीची जादू चित्रपट रसिकांच्या किती पसंतीस उतरते हे धारावी कट्टा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिसून येईलच. तत्पूर्वी या पोस्टर प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने सर्व उपस्थितांनी त्यांना चंदेरी दुनियेतील पुढील कारकिर्दीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

COMMENTS