Homeताज्या बातम्यादेश

६९ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. य

कोणीतरी जाणीवपूर्वक वावड्या उठवत आहे
IAS अधिकारी टीना डाबी झाल्या आई, जयपूर येथील रुग्णालयात मुलाला दिला जन्म
गुलाबराव उगले यांची जेऊर हैबत्ती गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड

६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यावर्षी राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलेल्या चित्रपट आणि कलाकारांची यादी आता समोर आली आहे. तर यात ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचंही नाव आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट गेल्या वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित झाला. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात काश्मीरमधील पंडितांवर झालेल्या अत्याचाराबाबत भाष्य करण्यात आलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा ओलांडला. तर आता यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये या चित्रपटाची दखल घेण्यात आली आहे.

द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत सामील झाला आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून नर्गिस दत्त पुरस्कार जाहीर झाला आहे. तरी याचबरोबर या चित्रपटासाठी अभिनेत्री पल्लवी जोशी हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ व्यतिरिक्त या राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीमध्ये ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. तर ‘मिमी’, ‘पुष्पा’, ‘आरआरआर’, ‘सरदार उधम’ चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. याबरोबरच ‘एकदा काय झालं’ आणि ‘गोदावरी’ या दोन मराठी चित्रपटांनाही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.

COMMENTS