मुंबई : ठाण्यातील मुंब्रा येथे एका 30 वर्ष जुन्या सदनिकेतील छताचे प्लास्टर अंगावर पडल्याने पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर आई, वडील आणि भाऊ

मुंबई : ठाण्यातील मुंब्रा येथे एका 30 वर्ष जुन्या सदनिकेतील छताचे प्लास्टर अंगावर पडल्याने पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर आई, वडील आणि भाऊ हे गंभीर जखमी झाले आहे. या घटनेमुळे परिसरात हलहळ व्यक्त केली जात आहे. तसेच इमारतीच्या दर्जाचा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. मुंब्रा येथील जीवन बाग परिसरात ही घटना घडली. उनेजा शेख असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेत उनेजाचे आई-वडील व भाऊ जखमी झाले आहेत. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
COMMENTS