Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिल्लीया महाविद्यालयात अंगदान जागृती कार्यक्रम संपन्न

बीड प्रतिनिधी - येथील मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मेरी माटी मेरा देश अभियाना

राखी मूर्ख नाही, फक्त तिची मुलांबद्दलची निवड वाईट” | LOKNews24
तामिळनाडूमध्ये भाजपची मित्रपक्षाने सोडली साथ
खर्डा येथे युवकाचा निर्घृण खून

बीड प्रतिनिधी – येथील मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत दिनांक 09 ऑगस्ट 2023 बुधवार रोजी अंगदान जागृती आणि पंचप्रण शपथ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. मोहम्मद ईलयास फाजील, समुपदेशक डॉ. अब्दुल समद, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस.एस. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शेख रफीक, प्राध्यापिका डॉ. शेख एजाज परवीन यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.शेख रफीक यांनी केले. प्रथम सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना पंचप्रण शपथ देण्यात आली. समुपदेशक अरेबिक विभाग प्रमुख डॉ. अब्दुल समद यांनी सांगितले की आपले शरीर ही एक ईश्वराची देणगी असून त्याची काळजी घेणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. शरीराचा प्रत्येक भाग हा अति महत्त्वाचा असून, अवयव दानाने जर एखाद्याचे प्राण वाचत असेल तर त्यापेक्षा श्रेष्ठ दान नाही असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. मोहम्मद ईलयास फाजील यांनी अंगदान व अवयव दाना बद्दल समाजामध्ये असलेला गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. रक्तदानाच्या महत्त्व बरोबरच, अंगदान व अवयव दानाचे महत्त्व याबद्दल जनजागृती व्हावी असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य हुसैनी एस एस. यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद व कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती.

COMMENTS