४७ कमी पटसंख्येच्या शाळा होणार बंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

४७ कमी पटसंख्येच्या शाळा होणार बंद

पुणे : राज्य सरकारने १० विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा घाट पुन्हा एकदा घातला आहे. अशा शाळा बंद करून विद्यार्थ्यांना जवळच

LOK News 24 दखल; अहमदनगर महापालिकेच्या अमृत योजनेचे पैसे थकले l LokNews24
सहा वर्षाच्या मुलाचा खून करून बापाची आत्महत्या | DAINIK LOKMNTHAN
कोपरगाव सबजेलमध्ये कैद्यांनी घातला राडा

पुणे : राज्य सरकारने १० विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा घाट पुन्हा एकदा घातला आहे. अशा शाळा बंद करून विद्यार्थ्यांना जवळच्या अन्य शाळांमध्ये जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. अशा सुमारे ४७ शाळा बंद केल्या जाणार आहेत. सरकारने अमरावती, पालघर, नंदुरबार, कोल्हापूर, अकोला, नाशिक, सिंधुदुर्ग, ठाणे, नगर जिल्ह्यातील शेकडो शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. या शाळांचे अन्य शाळेत समायोजन करताना विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने अध्यादेशाद्वारे स्पष्ट केले आहे. शाळा बंद करण्यासाठीची किमान पटसंख्या दहा इतकी निश्चित केली आहे. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना सात ते आठ किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. परिणामी विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता आहे.

COMMENTS