Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून 170 कोटी दंड वसूल

मुंबई : पश्‍चिम रेल्वेवरील लोकल, मेल-एक्स्प्रेस आणि विशेष रेल्वेमध्ये प्रभावीपणे तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत असून 2022-23 या वर्षात विनातिक

राहुरी पोलिसांची टाकळीमियाँ यात्रेत दंबगिरी
कर्जतच्या वनक्षेत्रात हरणाची शिकार
अ‍ॅड. आंबेडकरांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा

मुंबई : पश्‍चिम रेल्वेवरील लोकल, मेल-एक्स्प्रेस आणि विशेष रेल्वेमध्ये प्रभावीपणे तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत असून 2022-23 या वर्षात विनातिकीट प्रवास करणार्‍या 25 लाख 63 हजार प्रवाशांकडून 170.35 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यापैकी 43.07 कोटी रुपये दंड मुंबई विभागातील प्रवाशांकडून वसूल करण्यात आला आहे.
तिकीट काढून प्रवास करणार्‍या प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी आणि विनातिकीट प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यासाठी पश्‍चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली तिकीट तपासणी पथक कार्यरत आहे. या पथकाने 2021-22 मध्ये विनातिकीट प्रवाशांकडून 113.57 कोटी दंड वसूल केला होता. तर, 2022-23 मध्ये 25.63 लाख विनातिकीट प्रवाशांकडून तब्बल 170.35 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मार्च 2023 मध्ये लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांमधील मालडब्यातून आरक्षण न करता सामानाची ने-आण करणार्‍या, तसेच विनातिकीट प्रवास करणार्‍या एकूण 1.94 लाख प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 12.07 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच, तिकीट तपासनीसांच्या विशेष पथकाने मार्च 2023 मध्ये मुंबई विभागातून 3.08 कोटी दंड वसूल केला. तर, एप्रिल 2022 पासून ते आतापर्यंत वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणार्‍या 48 हजार 691 हून अधिक प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली

COMMENTS