Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षकांच्या मागणीसाठी संतप्त पालक व शालेय व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलुप

हिमायतनगर प्रतिनिधी - तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यतचे सात वर्ग आहेत.मागच्या वर

लग्नास वर्ष होत नाही तोच सासरचा छळ सुरु; कंटाळून विवाहितेने संपवलं जीवन
भाजप नेते, माजी खासदार प्रताप दादा सोनवणे यांचे निधन
कुष्ठधाम सोसायटीत फराळाचे साहित्य वाटप

हिमायतनगर प्रतिनिधी – तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यतचे सात वर्ग आहेत.मागच्या वर्षी या शाळेची एकुण विद्यार्थी संख्या ही145 ते 150पर्यंत  होती.या शाळेसाठी कायमस्वरूपी सात शिक्षकांची गरज असतांना शिक्षणाचे काम फक्त तीन शिक्षक बघत असतात.विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकही शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यातआहे.यामुळे संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी शाळा सुरू झालेल्या दुसर्‍याच दिवशी शुक्रवार दि.16जुन रोजी शाळेला कुलूप ठोकले आहे.मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत कुलूप न उघडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.जिल्हा परिषदेच्या या शाळेत पदवीधर शिक्षकांच्या जागा भरण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी मागणी पुर्ण होईपर्यंत शाळेला बेमुदत कुलूप ठोकले. तशास्वरुपाचा मजकूरच दर्शनी भागातील सूचना फलकावर लिहिला आहे.या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत 145ते 150विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यात चौथी ते सातवी या वर्गासाठी  चार पदवीधर शिक्षक असणे गरजेचे आहे. मात्र,या ठिकाणी एकाही शिक्षकाची नियुक्ती केली नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. या विषयी गावकर्‍यांनी गटशिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन देऊनआणि वारंवार विनंती करून देखील शाळेत पदवीधर शिक्षकांची पदे भरली नाहीत.त्यामुळे या विषयी वारंवार विनंती अर्ज करून ही मागणी मान्य होत नसल्याने शुक्रवारी शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी शाळेला बेमुदत कुलूप ठोकले.

COMMENTS