देशात कोरोनाचे 17 हजार 336 नवे रुग्ण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशात कोरोनाचे 17 हजार 336 नवे रुग्ण

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत 17 हजार 336 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशीच्या तुलनेत रुग्णांची संख

एक व्यक्ती देते कोरोनाचा चारशे जणांना प्रसाद
‘मग सुरक्षा काढून टाका’, पोलिसांच्या कुटुंबीयांनी नवनीत राणांना सुनावलं
फटका विक्री बंदीचा अध्यादेश प्रशासना कडून मागे

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत 17 हजार 336 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशीच्या तुलनेत रुग्णांची संख्या 30 टक्क्यांनी वाढली आहे. ही मागील 100 दिवसांमधील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. गुरुवारी दिवसभरात 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यामुळे देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5 लाख 24 954 वर पोहोचली आहे.
देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा 88 हजारांच्या पुढे गेला आहे. भारतात सध्या 88 हजार 284 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत आहेत. देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकतेचा दर 4.32 टक्के आणि रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.59 टक्के इतके आहे. तर महाराष्ट्रात 11 फेब्रुवारीनंतर एका दिवसात सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी दिवसभरात महाराष्ट्रात 5 हजार 218 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4989 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सर्वाधिक म्हणजे 2479 रुग्णांची भर पडली आहे. तसेच एका कोरोनाबाधित रुग्णाने आपला जीव गमवाला. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.83 टक्के झाले आहे.

COMMENTS