बनावट दस्तऐवज करून प्लॉटची परस्पर विक्री, चौघांविरुद्ध गुन्हा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बनावट दस्तऐवज करून प्लॉटची परस्पर विक्री, चौघांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर/प्रतिनिधी : खरेदी खताचा बनावट दस्तऐवज बनवत खोट्या कागदपत्रांच्या आधारे वृद्धाच्या प्लॉटची चौघांनी परस्पर विक्री केल्याची घटना नगर तालुक्यातील

के.जे.सोमैया महाविद्यालयात ’डोळ्यांची काळजी’ विषयावर व्याख्यान  
अहमदनगर शहरात डी-मार्ट मॉलचे उद्घाटन
अंगणवाडी सेविकांना आमदार तनपुरेंची भाऊबीज भेट

अहमदनगर/प्रतिनिधी : खरेदी खताचा बनावट दस्तऐवज बनवत खोट्या कागदपत्रांच्या आधारे वृद्धाच्या प्लॉटची चौघांनी परस्पर विक्री केल्याची घटना नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की अर्जुन बंगाळ यांच्या मालकीचा नागरदेवळे येथे 142.44 चौ.मी.बिनशेती लेआऊट मंजूर झालेला प्लॉट आहे. गेल्या अनेक वर्षापासून बंगाळ पत्नीसह पुणे येथे राहात असून दि. 15 जून रोजी ते प्लॉटला भेट देण्यासाठी नागरदेवळे येथे आले होते. त्यावेळी त्यांच्या मालकीच्या प्लॉटवर गाळ्यांचे व दुमजली इमारतीचे बांधकाम झाल्याचे निर्दशनास आले. अर्जुन बंगाळ यांनी गाळ्यात उभ्या असलेल्या व्यक्तीकडे विचारपूस केली असता त्याने बिल्डरच्या ऑफिसमध्ये जायला सांगितले. बिल्डर अली अकबर, अस्लम खान आणि सोएब शेख यांनी चार वर्षापूर्वी हा प्लॉट त्याच्या मालकाकडून विकत घेऊन आम्हाला खरेदीखताचा दस्तऐवज तयार करून प्लॉटची परस्पर विक्री केली, असे सांगितले. त्यानंतर बिल्डर अली अकबर याला विचारणा केली असता, मी चौकशी करून तुमची अडचण सोडवून देतो, असे सांगून त्याने बोळवण केली. बंगाळ यांनी प्लॉटच्या प्रमाणित नकला काढल्या असता रिझवान सय्यद याने बंगाळ यांचे नाव खरेदीखतामध्ये नमूद करीत बंगाळ यांच्याऐवजी डमी माणूस उभा करून खरेदीखत करून घेतले. या खरेदीचा दस्तऐवज तत्कालीन सहायक दुय्यम निबंधक यांच्यासमोर इम्रान शेख याच्या मदतीने करण्यात आला होता. या दस्तऐवजावर लिहून देणार्‍याचा पत्ता डिग्रस, ता.राहुरी असा असून या दस्तऐवजासोबत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र व दिलेला फोटो आणि अंगठा अन्य कोणाचा असून आधार कार्डविना हा व्यवहार करण्यात आला आहे. दस्तऐवज आणि त्यावर साक्षीदार म्हणून इम्रान शेख आणि मुजाहिद सय्यद यांनी लिहून देणार आणि घेणार यांच्या नावासमोर सह्या करीत बंगाळ उपस्थित नसताना त्यांचा अंगठा घेतल्याचे भासविले. या खरेदीच्या दस्तऐवजावर अ‍ॅड. शेख यांनी सही करीत साक्षीदारास ओळखतात असे नमूद केले. सर्व आरोपींनी संगनमत करून दि.26 डिसेंबर 2017 रोजी बनावट खरेदीखत बनवून अर्जुन बंगाळ यांची फसवणूक केली.
याबाबत अर्जुन जगन्नाथ बंगाळ (वय 75, रा. सहकारनगर, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रिझवान ईस्माइल सय्यद, शेख इम्रान, सय्यद मुजाहिद (सर्व रा. भिंगार, अ.नगर), अ‍ॅड. तनवीर महेमूद शेख (रा. गोविंदपुरा,अ.नगर) आणि फिर्यादीच्या जागी खरेदीसाठी उभा केलेला बनावट व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असून अधिक तपास कोतवाली करीत आहेत.

COMMENTS