Homeताज्या बातम्यादेश

देशातील कोळसा उत्पादनात 17.13 टक्के वाढ

नवी दिल्ली : देशात एप्रिल-नोव्हेंबर 2022 दरम्यान कोळशाचे भरीव उत्पादन झालेय. गतवर्षी याच कालावधीतील 447.54 दशलक्ष टन (एमटी ) कोळशाचे उत्पादन

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची वृत्त लोकांची दिशाभूल करणारे
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन
श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे चैत्र यात्रेस प्रारंभ

नवी दिल्ली : देशात एप्रिल-नोव्हेंबर 2022 दरम्यान कोळशाचे भरीव उत्पादन झालेय. गतवर्षी याच कालावधीतील 447.54 दशलक्ष टन (एमटी ) कोळशाचे उत्पादन झाले होते. त्यामध्ये यंदा 17.13 टक्के वाढ झाली. यंदा 524.20 एमटी कोळशाचे उत्पन्न झाले आहे. कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) मधील कोळशाच्या उत्पादनात गतवर्षाच्या याच कालावधीतील 353.41 एमटी च्या तुलनेत यंदाच्या वर्षी 16.76 टक्क्यांची वाढ झाली असून नोव्हेंबरपर्यंत ते 412.63 एमटी इतके नोंदवले गेले आहे.
कोळसा उत्पादन क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने, कोळसा मंत्रालयाने 141 नवीन कोळसा खाणी व्यावसायिक लिलावासाठी निश्‍चित केल्या आहेत आणि देशातील विविध कोळसा कंपन्यांशी नियमितपणे संपर्क साधत त्यांच्या उत्पादनावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. देशांतर्गत उत्पादन आणि वितरण वाढवण्यासाठी केलेल्या सर्वांगीण प्रयत्नांचे अत्यंत चांगले परिणाम दिसून आले आहेत.भारत हा ऊर्जा वापरणारा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे आणि विजेची मागणी दरवर्षी सुमारे 4.7 टक्के वाढते. जलद वाहतूक सुनिश्‍चित करण्यासाठी, पीएम-गती शक्ती योजनेअंतर्गत सर्व प्रमुख खाणींना रेल्वेमार्गाने जोडत, पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी कोळसा मंत्रालय पावले उचलत आहे.परिणामी, एप्रिल-नोव्हेंबर 22 या कालावधीत 7.45 टक्क्यांची वाढ दर्शवित,एकूण 557.95 एमटी कोळश्याची वाहतूक झाली.यावरून, देशभरातील विविध क्षेत्रात झालेली कोळशाच्या वितरणाची सुस्थिर आणि कार्यक्षम स्थिती लक्षात येते.

COMMENTS