दुर्गा देवीच्या विसर्जनादरम्यान १४ वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुर्गा देवीच्या विसर्जनादरम्यान १४ वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू

पियुष केशव कावडे असे मृत झालेल्या मुलाचे नाव

नागपूर प्रतिनिधी / दुर्गा देवीच्या विसर्जन करण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीत १४ वर्षीय मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.  पियुष केशव कावडे असे मृत

जर्मनी करणार महाराष्ट्रात 300 कोटींची गुंतवणूक
शिपाई चालवतो रायमोह जिल्हा बीड येथील दवाखाना | LOKNews24
विदर्भातील साखर कारखान्यांच्या अभ्यासासाठी समिती गठित: सहकारमंत्री पाटील

नागपूर प्रतिनिधी / दुर्गा देवीच्या विसर्जन करण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीत १४ वर्षीय मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.  पियुष केशव कावडे असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. पियुष हा त्याच्या घराच्या शेजारी विराजमान देवीच्या मूर्तीचे विसर्जन मिरवणुकीत हाती झेंडा घेऊन सहभागी झाला होता. मिरवणूक बालाजीनगर येथे पोहचली. तिथे रस्त्याच्या बाजूला खांबावर असलेल्या विद्युत डिपीला लोखंडी दांडा असलेल्या झेंड्याचा स्पर्श झाला. यात विजेचा धक्का लागल्याने तो खाली कोसळला. मिरवणुकीत सहभागी काही तरुणांनी त्याला डिंगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS