काळ्याभोर दाढी-मिशांसाठी

Homeलाईफस्टाईल

काळ्याभोर दाढी-मिशांसाठी

सध्या दाढी-मिशा ठेवण्याचा फॅशन सुरु आहे. दाढी-मिशा ठेवायच्या तर त्यांची काळजी घेणं हे आलंच. मग महागडी प्रोडक्ट्स विकत घेणं, पैसे घालवणं आलं. पण मित्र

‘सम्राट पृथ्वीराज’ नंतर ‘या’ लूकमध्ये दिसणार ‘विश्वसुंदरी’
नवरात्र उत्सव हा नऊ दिवसच का ?
सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनचे कराड बस स्थानकासह कॉटेज हॉस्पिटलमध्ये उद्घाटन

सध्या दाढी-मिशा ठेवण्याचा फॅशन सुरु आहे. दाढी-मिशा ठेवायच्या तर त्यांची काळजी घेणं हे आलंच. मग महागडी प्रोडक्ट्स विकत घेणं, पैसे घालवणं आलं. पण मित्रांनो, काही घरगुती उपयांनी दाढी-मिशांची नजाकत टिकवून ठेवता येते. यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करावा. काही उपाय आजमावावेत.

तुळशीची पानं कांद्यांच्या रसात मिसळून हे मिश्रण लावल्याने दाढी-मिशा पांढर्‍या होत नाही.

कच्ची पपई वाटून त्यात चमचाभर हळद, कोरफडीचा रस घाला. या मिश्रणामुळे दाढी-मिशा मुलायम आणि काळ्या राहतात.

कढीपत्ता घालून पाणी उकळा. हे पाणी दाढी-मिशांना लावा. केस पांढरे होत नाहीत.

खोबरेल तेलात कढीपत्ता घालून हे मिश्रण उकळून घ्या. या तेलाने दाढी-मिशांना रोज मसाज करा. केस काळे राहतील.

आवळ्याची पूड, खोबरेल तेल उकळून घेऊन ते दाढी-मिशांना लावा.

जवसातल्या ओमेगा 2 फॅटी असिडमुळे दाढी-मिशांचे केस काळे राहतात. त्यामुळे जवस दररोज खायला पाहिजे.

तुरटी आणि गुलाबजलचं मिश्रण मिशी आणि दाढीच्या केसांना लावल्यास केसांचा रंग परत मिळवता येतो. यासाठी तुरटी आणि गुबालजल मिश्रित करुन दाढीच्या केसांवर लावा.

बटाटे आणि डाळीची पेस्ट पांढरे केस दूर करण्यात फायदेशीर ठरतात. बटाट्यामध्ये ब्लीचिंगचे नैसर्गिक गुण असतात. त्यामुळे डाळीमध्ये बटाट्याची पेस्ट टाकून केसांना लावल्यास केसांचा नैसर्गिक रंग पुन्हा येतो.

COMMENTS