Homeताज्या बातम्यादेश

देशात रस्ते अपघातात 12 टक्क्यांनी वाढ

केंद्रीय रस्ते वाहतूक मत्रांलयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट

नवी दिल्ली ः देशभरात अपघातांची वाढती संख्या चिंताजनक असतांना, या रस्ते अपघातात वर्षभरात तब्बल 12 टक्के वाढ झाल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महा

सातार्‍यात वाढदिवसाचा केक रस्त्यावर कापणार्‍या 16 जणांना अटक
कामावरुन काढल्याच्या रागातून मालकिणीला जिवंत जाळलं अन् स्वतःही जळाला
राज्यात वाढणार पावसाचा जोर

नवी दिल्ली ः देशभरात अपघातांची वाढती संख्या चिंताजनक असतांना, या रस्ते अपघातात वर्षभरात तब्बल 12 टक्के वाढ झाल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात रस्ते अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. दररोज होणार्‍या किरकोळ तसेच गंभीर स्वरुपाच्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या वर्षभरात रस्ते अपघातात तब्बल 12 टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय अपघातांची अनेक धक्कादायक कारणे देखील अहवालात नमूद करण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षात म्हणजेच 2022 मध्ये देशात एकूण 4 लाख 61 हजार 312 किरकोळ तसेच गंभीर स्वरुपाच्या रस्ते अपघातांची नोंद झाली. यामध्ये 1 लाख 68 हजार 491 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 4 लाख 43 हजार 366 लोक अपघाताच्या घटनेत जखमी झाले. मागील वर्षाच्या म्हणजेच 2021 च्या तुलनेत या आकडेवारीत तब्बल 11.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर मृतांमध्ये 9.4 टक्के आणि जखमींच्या संख्येत 15.3 टक्के वाढ झाली आहे. अतिवेगाने तसेच धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे हे रस्ते अपघातांचे सर्वात मोठे कारण असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. याशिवाय, मद्यपान करून वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे, अशा कारणांमुळे रस्ते अपघातांच्या घटना वाढल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हेल्मेट नसल्यामुळे बाईक चालवताना झालेल्या अपघातात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षभरात दुचाकी अपघातात 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामधील 14 हजार 337 लोकांच्या डोक्यात हेल्मेट नव्हते. हेल्मेटबरोबर सीट बेल्ट न बांधलेल्या लोकांच्या देखील मृत्युमध्ये वाढ झाली आहे.

COMMENTS