Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार अपात्रतेचा उद्या निकाल ?

विधानसभा अध्यक्षांनी तज्ज्ञांकडे पाठवला निकालपत्राचा मसुदा

मुंबई ः आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, आता निकालाची प्रतीक्षा आहे. त्यापूर्वी रविवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्

यंदा दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल वेळेतच जाहीर होणार
ओबीसी आरक्षणावर शिक्कामोर्तब… ठाकरे सरकारच्या अध्यादेशावर राज्यपालांनी केली स्वाक्षरी
81 व्या औंध संगीत महोत्सवास दिमाखात प्रारंभ

मुंबई ः आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, आता निकालाची प्रतीक्षा आहे. त्यापूर्वी रविवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर गुप्त भेट घेतल्याचे बोलले जात आहे, त्यानंतर सोमवारी विधानसभा अध्यक्षांनी निकालपत्राचा मसुदा तज्ज्ञांकडे पाठवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अखेर शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाची तारीख निश्‍चित झाली आहे. 10 जानेवारीला दुपारी 4 वाजेपर्यंत या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 10 जानेवारीपर्यंत निकाल लावण्याचे निर्देश दिले असून, मुदत संपण्यासाठी दोन दिवसांचा अवधी उरल्यामुळे उद्या बुधवारी आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्षांच्या निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचेही काम सुरू आहे. निकालातील ऑरेटिव्ह पार्टच फक्त वाचला जाणार आहे. यानंतर सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे 16 आमदार अपात्र ठरतील का? आणि जर ते अपात्र झाले, तर राज्य सरकारचे अस्तित्व संपुष्टात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे जर पात्र ठरले तर उद्धव ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरतील का? किंवा यापेक्षा वेगळा निकाल लागेल का? अशा अनेक शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांना याबाबत निर्णय घ्यायचा आहे. ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली त्यावेळी राजकीय पक्ष कोणाचा होता? जर त्यादिवशी राजकीय पक्ष एकनाथ शिंदेंचा होता, तर मग राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष अशी जी विभागणी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात केली आहे, त्याचा नेमका अर्थ काय? याचा सारासार विचार करुन अन्वयार्थ लावणारा हा देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक निवाडा असणार आहे. विधानसभा अध्यक्षांनीही स्वतः अनेकदा हा निवाडा ऐतिहासिक असल्याचे विधान केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रविवारी वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. दोघांच्या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. न्याय देणारा ट्रिब्युनल हाच आरोपीच्या घरी त्याला भेटायला जातो. यावरूनच देशातील न्याय व्यवस्था किती गंभीर अवस्थेला पोहोचली आहे हे लक्षात येते असे राऊतांनी म्हटले आहे.

नार्वेकरांसमोर पर्याय कोणते? – सर्वप्रथम म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ठाकरे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवणे. दुसरा पर्याय म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना अपात्र ठरवणे. किंवा मग कोणत्याही गटाच्या बाजूने निकाल देण्याऐवजी नार्वेकर स्वत:च विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशीही शक्यता चर्चिली जात आहे. याशिवाय राहुल नार्वेकर तटस्थ निकाल देऊन कोणत्याही गटाला अपात्र ठरवणार नाही, अशा विविध प्रकारच्या शक्यता जाणकारांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

COMMENTS