Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुतीसह अनेक पक्षांचा उमेदवारांना ‘दे धक्का’!

उमेदवारांची कोंडी सुटेना ; अनेकांच्या उमेदवारीत ऐनवेळी बदल

मुंबई ः लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना महायुतीने अनेक उमेदवारांना दे धक्का दिला आहे. अनेक जागांवर युती आणि आघाडीचा उमेदवार ठरतांना दिसून

पत्रकार संजय वाघ यांच्या वरील गुन्ह्याचा तपास सी. आय .डी. कडे द्यावा
अहमदनगरमध्ये दहा दिवसांत 2 हजार 740 वीज जोडण्या
नाशकात 22 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या | LOKNews24

मुंबई ः लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना महायुतीने अनेक उमेदवारांना दे धक्का दिला आहे. अनेक जागांवर युती आणि आघाडीचा उमेदवार ठरतांना दिसून येत नाही. अनेक जागांवर चर्चा होत असली तरी कोंडी फुटत नसल्याचे दिसून येत आहे. महायुतीतील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ऐनवेळी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीचा पत्ता कापल्यानंतर त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. दुसर्‍या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याचा गुरूवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यात विशेष करून अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, अमरावतीमधून भाजपा उमेदवार नवनीत राणा, नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर तर हिंगोलीतून बाबुराव कदम पाटील कोहळीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भव्य रॅली काढली होती.

भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी गुरूवारी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश केला. धाराशिवमधून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी थेट लढत होणार आहे. दरम्यान, यवतमाळ-नांदेड लोकसभा मतदारसंघात हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली. त्या ठिकाणी गेल्या 25 वर्षांपासून खासदार असलेल्या भावना गवळी यांचा पत्ता कट झाला. राजश्री पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार हेमंत पाटील, मंत्री संजय राठोड यांची उपस्थिती होती. परंतु ज्यांचा पत्ता कट झाला. त्या भावना गवळी या ठिकाणी अनुपस्थितीत दिसल्या. त्यामुळे भावना गवळी नेमके कुणाचे काम करतात, यावर या मतदारसघांतील निकाल ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश – धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अर्चना पाटील यांना धाराशिव लोकसभेची उमेदवारी देखील जाहीर केली. या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर, आमदार ज्ञानराज चौघुले, आमदार विक्रम काळे यांची उपस्थिती होती. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील ’घड्याळ’ चिन्हावरुन मैदानात उतरणार असल्याचे आज अगदी स्पष्ट झाले. अर्चना पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत पक्षप्रवेश झाला असून सुनील तटकरेंनी त्यांची उमेदवारी देखील जाहीर केली आहे.

वंचितकडून परभणीत उमेदवार बदलला – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देखील परभणीत अचानक उमेदवार बदलण्यात आला आहे.  वंचितने परभणीतून बाबासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, आता त्यांच्याजागी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंजाबराव डख यांनी गुरुवारी परभणीतून वंचितचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला. परभणीत महाविकास आघाडीकडून संजय उर्फ बंडू जाधव आणि महायुतीकडून महादेव जानकर हे रिंगणात आहेत. आता पंजाबराव डख या निवडणुकीत त्यांच्यासमोर कितपत आव्हान निर्माण करू शकतात, हे येत्या काळात समोर येईलच.

COMMENTS