हेळगावच्या क्रीडा संकुलास एक कोटीचा निधी मंजूर

Homeमहाराष्ट्रसातारा

हेळगावच्या क्रीडा संकुलास एक कोटीचा निधी मंजूर

शासनाच्या क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत येथे होणार भव्य दिव्य असे प्रेक्षागृह.

Devendra Fadanvis : राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यन्वित होणार आहे की नाही? | LOKNews24
उद्धव ठाकरेंनी फक्त फाईल गायब नाही केल्या , तर बंगले सुद्धा गायब केले –  किरीट सोमय्या
महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्ष पदी पी. आर. पाटील

मसूर / दादासाहेब काशीद : शासनाच्या क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत येथे होणार भव्य दिव्य असे प्रेक्षागृह. बंदिस्त प्रेक्षागृहासाठी 90 लाख आणि जिल्हा क्रीडा खात्याकडून 21 लाख रुपये असे मिळून एकूण 1 कोटी 11 लाख रुपयांची क्रीडा संकुलनाची भव्य इमारत हेळगावकरांच्या सेवेस उभी राहणार आहे. ज्यामध्ये 40-25 मीटरचा भव्य हॉल, खो-खो, कबड्डी, कुस्ती, बॅडमिंटन, बुध्दिबळ, बास्केट बॉल, मॅटवरील कुस्ती अशा अनेक क्रीडा क्षेत्रातील खेळांचे ऑलंम्पिक पध्दतीने प्रशिक्षण घेता येणार आहे.

राज्याचे सहकार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या खास प्रयत्नातून या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्याकडून ओपन जिम, वॉल कंपाऊंड आणि जमीन सपाटीकरण यासाठी ही निधी उपलब्ध होणार आहे. या क्रीडा संकुलनामुळे हेळगावसह पाडळी सारख्या ग्रामीण भागातील सर्व वयोगटातील मुलां-मुलींना राज्य आणि देशपातळीवर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आपले उज्वल भवितव्य घडवण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

गावच्या उत्तरेस कराड कोरेगाव रस्त्यालगत बिरोबाचा माळ या ठिकाणी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी 42 गुंठे जागा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या अनेक वर्षापासून वापरात नसलेले परंतू गावच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी असलेली 42 गुंठे जागा येथील सिध्दिविनायक मंडळ (ट्रस्ट) यांच्या नावावर होती. परंतू आपल्या गावच्या सार्वजनिक विकासाचा आणि उदयास येणार्‍या भावी पिढीच्या भवितव्याचा विचार करून सिध्दिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे आणि इतर संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि ही महत्वपूर्ण असलेली जागा ग्रामपंचायतीच्या नावावर करून दिली. गावास उपलब्ध झालेल्या जागेमुळे आणि ना. बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आता भव्य दिव्य अशी मोठी वास्तू हेळगावच्या या नावलौकिकात आणखी भर पाडणारी ठरणार आहे.

या कामासाठी कागदपत्रांची पूर्तता आणि मंत्रालयापर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी येथील माजी तालुका पंचायत सदस्य अशोक संकपाळ, ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. शारदाताई जाधव, उपसरपंच संजय सूर्यवंशी, अभियंता विक्रमसिंह पाटील, माजी सरपंच बाळकृष्ण जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे, माजी अध्यक्ष श्रीमंत सूर्यवंशी तसेच सोसायटीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण, सदाशिव पवार, उद्योजक मिलिंद पाटील, ग्रामपंचायत माजी सदस्य शामराव सूर्यवंशी, विद्यमान सदस्य कौस्तुभ सूर्यवंशी, विक्रम कुंभार ग्रामविकास अधिकारी मनिष पाटील, धीरज पाटील यात्रा कमिटी अध्यक्ष हनुमंत पाटील यांनी प्रयत्न केले.

COMMENTS