Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याण मध्ये  गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर

कल्याण प्रतिनिधी- डोंबिवलीमध्ये संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले असताना आता कल्याणमध्येही पोलीसांनी दादा भाईंच्या मुसक्य

एका विषयाचे दोन सोबती !
चोरटयांनी तरुणीच्या बाबतीत केले हे कृत्य ;पाहा व्हिडीओ l
सलमानकडे रिक्षा चालवण्याचं लायसन्स आहे का? | LOKNews24

कल्याण प्रतिनिधी- डोंबिवलीमध्ये संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले असताना आता कल्याणमध्येही पोलीसांनी दादा भाईंच्या मुसक्या आवळण्यासाठी कंबर कसली आहे. कल्याण पूर्वेत विशेषतः खुलेआम गुन्हेगारीमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. हत्यार घेऊन लोकांना घाबरवणे, शस्त्र घेऊन फिरणे, तलवारी घेऊन दहशदी माजवणे, हल्ला करणे चोऱ्या करणे अशा एक ना अनेक घटनांमुळे पूर्व परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीसांनी मोक्काअंतर्गत कारवाया आणि तडीपारीच्या कारवाया या  गोष्टीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या वर्षभरात कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 16 लोकांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. गेल्या चार महिन्यात 5 जणांना तडीपार करण्यात आला आहे. तर वर्षभरात 8 जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. सध्याची संघटित गुन्हेगारी पाहता आगामी काळात मोक्का आणि तडीपारीच्या कारवायांना देखील वेग येणार असल्याचे पोलिसांनी सूचित केले आहे. त्यामूळे आता खुलेआम पणे दहशत माजवली तर जास्त काळासाठी गुंडांचा मुक्काम जेलमध्ये असणार हे नक्की. कल्याण पूर्वेत तरुणाईचा गुन्हेगारीत जास्त समावेश असल्याचं निदर्शनास आल आहे. त्यातही 18 ते 22 या वयोगटातील मुलांचं प्रमाण गुन्हेगारीत जास्त असल्याचं पोलीसांनी सांगीतल आहे. सध्या तरुणांना लागलीच राग येतो अणि नंतर त्यातून गुन्हा घडतो. अशा लोकांवर देखील विविध कलमानुसार ( 107 प्रमाणे – 168, 110 प्रमाणे 31 तर 109 प्रमाणे 9 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. 

COMMENTS