हिवरेझरे येथे गांजासह एकास अटक, गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिवरेझरे येथे गांजासह एकास अटक, गुन्हा दाखल

महाराष्ट्र शासनाचा अंमली पदार्थ विक्री व बाळगण्याकरिता प्रतिबंध असताना बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी एकास तीन किलो गांजासह पोलिसांनी अटक केली.

वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कोतवालीची कारवाई
दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी l DAINIK LOKMNTHAN
नगरच्या किल्ल्यात देशविरोधात घोषणा देणारा अटकेत

अहमदनगर/प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाचा अंमली पदार्थ विक्री व बाळगण्याकरिता प्रतिबंध असताना बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी एकास तीन किलो गांजासह पोलिसांनी अटक केली. ही कारवाई नगर तालुक्यातील हिवरे झरे येथे केली. 

याबाबतची माहिती अशी की, नगर तालुक्यातील रामचंद्र उदमले हे गांजा या अंमली पदार्थाची विक्री करत असून त्यांनी त्यांच्या घरात गांजाची साठवणूक केली आहे, अशी माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी हिवरेझरे येथील उदमलेच्या घरी जाऊन छापा टाकला असता घराच्या व्हरांड्यात तुटलेल्या सोफासेटखाली तीस हजार रुपये किमतीचा प्लॅस्टिक पिशवीत तीन किलो एकशे दहा ग्रॅम वजनाचा लपवून ठेवलेला गांजा पोलिसांना झडतीमध्ये आढळून आला. यावरून पोलिसांनी गांजा ताब्यात घेऊन उदमले यास अटक केली. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी पोलिस नाईक भानुदास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापार यावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलमाप्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राऊत करीत आहे.

COMMENTS