सोमवारच्या महाराष्ट्र बंदमध्ये शहर जिल्हा काँग्रेस सहभागी होणार – किरण काळे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोमवारच्या महाराष्ट्र बंदमध्ये शहर जिल्हा काँग्रेस सहभागी होणार – किरण काळे

नगर : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने लखमीपुर शेतकरी नरसंहाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचे एलान करण्यात आले आहे. नगर शहरामध्ये

वाकडीत एक हजार विद्यार्थांना बुट आणि सॉक्सचे वाटप
देशात व राज्यात परिवर्तनाची लाटः आकाश नागरे
राहुरी तालुक्यात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या सभांची वाणवा  

नगर : प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारच्या वतीने लखमीपुर शेतकरी नरसंहाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचे एलान करण्यात आले आहे. नगर शहरामध्ये सोमवारी (दि. ११ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी शहर जिल्हा काँग्रेस देखील महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे. 

शहर व जिल्हा शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन तर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देताना किरण काळे म्हणाले की, शिवसेना शहर प्रमुख यांच्याशी महाराष्ट्र बंदमध्ये संयुक्तरित्या सहभागी होण्याबाबत चर्चा झाली असून नगर शहर शिवसेना व शहर काँग्रेसमध्ये यावर समन्वय झाला आहे. लखमीपुरची घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. यामुळे देशामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. महाराष्ट्रामध्ये विधिमंडळ पक्षाचे नेते ना.बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी देखील आम्हाला महाराष्ट्र बंद बाबत निर्देश दिले आहेत. 

अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्व फ्रंटल, विभाग, सेल, आघाड्या यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील या महाराष्ट्र बंदमध्ये शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने नगर शहरातून सहभागी होतील. सदर बंद हा शांततेच्या मार्गाने आणि कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न पोलीस प्रशासनासमोर निर्माण होणार नाही, तसेच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून पार पडेल, असे काळे यांनी म्हटले आहे. 

COMMENTS