Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासाठी 21 नोव्हेंबरला मतदान

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. त्यानुसार सोमवार, दि. 18 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रि

राजारामबापू कारखाना अध्यक्षपदी प्रतीक पाटील यांची निवड; उपाध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष विजयराव पाटील
शेतक-यांनी जिवाणू खतांचा वापर वाढवावा : कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील
महावितरणच्या अधिकार्‍यांची मनमानी; थकबाकी वसूलीसाठी संपूर्ण विज पुरवठा बंद

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. त्यानुसार सोमवार, दि. 18 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 21 नोव्हेंबर रोजी 21 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये सोसायटी मतदार संघात चुरस असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
सातारा जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी 4 रोजी जाहीर झाली होती. परंतू कोल्हापूर आणि पुणे बँकेसंदर्भात उच्च न्यायालय याचिका दखल झाल्यामुळे सातारा जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम उशिरा जाहीर करण्यात आला. अखेर शनिवारी तो जाहीर झाला. सोमवारपासून हा निवडणूक कार्यक्रम सुरू होत आहे. दि. 18 ते 25 अर्ज दाखल करणे. 26 ऑक्टोंबर रोजी अर्ज छाननी आणि 27 रोजी उमेदवारांची यादी प्रसिध्द होणार आहे.
27 ऑक्टोंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. दि. 11 नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दि. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 5 या वेळेत मतदान होणार आहे. तर दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर होणार असल्याने जिल्ह्यात तणावाचे वातावरण असणार आहे.

COMMENTS