राहुरी तालुक्यात ऊस पिकावर हूमणी अळीचा प्रादूर्भाव

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी तालुक्यात ऊस पिकावर हूमणी अळीचा प्रादूर्भाव

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी  राहुरी तालुक्यातील  काही गावातील परिसरात ऊस पिकावर  हुमणी अळीचा  मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन सुमारे

देवाज् ग्रुपच्या वतीने प्रोफेसर कॉलनी चौकात शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन
मांडओहळ धरण सलग तिसऱ्या वर्षी ‘ओव्हर फ्लो’
संकट काळात प्रामाणिक सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची देशाला गरज – पद्मश्री पोपटराव पवार.

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी 

राहुरी तालुक्यातील  काही गावातील परिसरात ऊस पिकावर  हुमणी अळीचा  मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन सुमारे 80 ते 90 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी  शेतकर्‍यांनी केली आहे.

सलग 4 वर्षापासून या हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने ऊस पिकाचे नुकसान  होत आहे. याबाबत कृषी सहाय्यक शिवप्रसाद कोहकडे म्हणाले, या अळीचा प्रादुर्भाव खोडवा ऊस पिकावर  व हलक्या व पाण्याचा लवकर निचरा होणार्‍या जमिनीत जास्त प्रमाणात फैलाव होतो. हुमणी अळी सुरवातीच्या लहान अवस्थेत असताना तिला खाण्यास पोषक वातावरण तयार होऊन तिची जमिनीत वाढ होते. तशी ती उसाच्या मुळ्या कुरतडून खाते. त्यामुळे उसाची पाने पिवळी पडू लागतात व नंतर सुकू लागतात. नंतर उसाचे बेटच कोलमडते. अशाप्रकारे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात अळीची  पूर्ण वाढ झाल्याने या काळात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव जाणवतो. आम्ही सुरवातीपासूनच कृषी खात्यामार्फत या अळीच्या बंदोबस्तासाठी वेळोवेळी सूचना देऊन लाईट ट्रॅप, जैविक औषध फवारणी, इतर किटक नाशके वापरण्याचे तसेच शेतात पिकांचा फेरपालट करण्याचा आदी प्रकारचे मार्गदर्शन करून काही प्रात्यक्षिक करून दाखविले आहे. असेही कोहकडे यांनी सांगितले. मात्र, सध्यातरी या हुमणी  रोगाने ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेले आहेत. शासनाने याची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

COMMENTS